ठाण्यात सायकल राईडमधून एचआयव्ही-एड्स व सिफिलीस या आजारांबाबत जनजागृतीचा संदेश!
ठाण्यात सायकल राईडमधून जनजागृतीचा संदेश!
तब्बल २८७ सायकलप्रेमींचा सहभागः एचआयव्ही व सिफिलीस या आजारांबाबत
ठाणे, ता. ८ (बातमीदार) : ठाणे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे आणि आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ८) सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते. यामधून एचआयव्ही-एड्स व सिफिलीस या आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात पाच वर्षांपासून ते ७७ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील तब्बल २८७ सायकलप्रेमींनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली असून, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सायकलप्रेमींच्या उत्साहाचे कौतुक केले. ते म्हणाले की, फिटनेस आणि आरोग्य याकडे युवकांनी लक्ष दिले पाहिजे. एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि एड्स या दोन्ही गोष्टींमध्ये फरक असून, योग्य माहिती आणि जनजागृतीमुळे या आजाराविषयीची भीती कमी झाली आहे. एचआयव्हीमुक्त भारत हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. पवार यांनी एचआयव्ही व एड्सबाबत कारणे, उपाययोजना आणि उपचारातील प्रगती याबद्दल माहिती दिली. २०१०-११च्या तुलनेत आज एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण घटल्याचे त्यांनी सांगितले आणि हे जनजागृतीमुळे शक्य झाल्याचेही नमूद केले. युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याने जनजागृती अधिक गरजेची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा मुख्य दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे, फाउंडेशनचे सचिव दीपेश दळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश महावरकर, जिल्हा पर्यवेक्षक अशोक देशमुख, निलिमा पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया पुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन रतन गाढवे यांनी केले.
सतीश प्रधान यांचा गौरव
या कार्यक्रमात सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अध्यक्ष कमलेश प्रधान यांना कैलास-मानसरोवर यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांनी उपस्थितांना फिटनेस, चिकाटी आणि श्रद्धेचे महत्त्व अधोरेखित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

