पुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांसाठीचे हे पहिलेच प्रदर्शन

पुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांसाठीचे हे पहिलेच प्रदर्शन

Published on

पुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांसाठीचे हे पहिलेच प्रदर्शन
खासदार नरेश म्हस्के यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : पुनर्विकासाचा विचार करणाऱ्या सोसायट्यांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारे हे पहिलेच प्रदर्शन असल्याचे प्रतिपादन खासदार नरेश म्हस्के यांनी केले. ठाण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रात नवा आयाम निर्माण करणारा री-डेव्हलपमेंट एक्स्पो २०२५ चे उद्‍घाटन क्रेडाई-एमसीएचआय ठाणेतर्फे शनिवारी (ता. ८) झाले. ठाणे येथील रेमंड ट्रेड शो हॉल येथे झालेल्या या प्रदर्शनाला दोन हजारांहून अधिक प्रतिनिधी, गृहनिर्माण सोसायटी सदस्य, विकसक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
पुनर्विकास थांबणे, भाडे थांबणे यासारख्या समस्या अनेकदा अतिअपेक्षा ठेवल्यामुळे निर्माण होतात. फक्त विकसकांनाच दोष देता येत नाही. सोसायट्यांनीही व्यावहारिक दृष्टिकोनातून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन नरेश म्हस्के यांनी केले. पुनर्विकास शक्य करण्यासाठी राज्यातील धोरणात्मक बदलांचे श्रेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जात असल्याचेदेखील त्यांनी या वेळी सांगितले.
दरम्यान, ठाण्यातील जवळपास निम्मी घरे ३० वर्षांपेक्षा जुनी आहेत. योग्य पद्धतीने पुनर्विकास केल्यास हीच परिस्थिती घरमालकांसाठी मोठी संधी ठरू शकते, असे ठाणे क्रेडाई-एमसीएचआयचे माजी अध्यक्ष अजय अशार यांनी सांगितलेया प्रदर्शनामुळे ठाण्यातील पुनर्विकासाला नवचैतन्य मिळेल. ठाण्याचे भविष्य उज्ज्वल आहे आणि पुनर्विकासामुळे ते आणखी उजळून निघेल, असे मानद सचिव फैय्याज विराणी यांनी सांगितले.

ठाणे व्हिजन २०३० अहवालाचे उद्‍घाटन
विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे यांच्या हस्ते ठाणे व्हिजन २०३० या अहवालाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी पुनर्विकास करताना समाजातील सामाजिक बंध जपले जाणे अत्यावश्यक आहे. विक्रीयोग्य घरांचे आणि पुनर्विकासातील रहिवाशांच्या घरांचे दर्जामध्ये फरक राहू नये, अशी अपेक्षा डावखरे यांनी या वेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com