मन मंदिरा...मन आरोग्याचा अर्थ सांगणारा सांगितीक कार्यक्रम संपन्न
मन मंदिरा...मन आरोग्याचा
सांगितीक कार्यक्रमाला रसिक डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ ः उत्साही रसिक, दर्दी प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या सर्वेश सभागृहात ‘मन मंदिरा... मन आरोग्याचा’ अर्थ उलगडून सांगणारा मनोदय ट्रस्ट आयोजित सांगीतिक कार्यक्रम सर्वांची मनं मंदिर उजळवणारा ठरला. हिंदी, मराठी नवी, जुनी गाणी निवडून एक धागा सुखाचा, मन मंदिरा, तोरा मन दर्पण, ये हौसला कैसे झुके, किसी की मुस्कुराहटों पे... आदी गाण्यातून ध्वनित होणाऱ्या भावना, विचारांचा अर्थ उलगडून सांगताना भावनांच्या विकासाचे महत्व डॉ. अद्वैत पाध्ये यांनी विशद केले.
ज्येष्ठ संगीत संयोजक उदय चितळे यांच्या मेंदीच्या पानावरच्या उत्कृष्ट वाद्यवृंदासह कॅसिओवर अभिषेक जहागीरदार, ऑक्टोपॅडवर रोहन मोकल, तबला/ढोलकवर अनिल खैरनार या सर्व गायकांनी सादर केलेल्या अप्रतिम गाण्यांमुळे हा कार्यक्रम संस्मरणीय झाला. यावेळी गाण्यांकडे बघायची एक वेगळी दृष्टी आम्हाला मिळाल्याचा अभिप्राय रसिक प्रेक्षकांनी नोंदवला.
रोहित पाध्ये, गौरव केळकर, प्रथमेश जोशी, अपूर्वा चितळे, सायली खेर-परांजपे, गायत्री महाबळेश्वरकर या गायकांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली. सहनिवेदक म्हणून प्रथमेश जोशींनी केलेले निवेदनही उत्कृष्ट होते. गायकांपैकी काही जण हे शास्त्रीय/सुगम संगीत विशारद होते. यावेळी मनोदय ट्रस्टचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
डॉ. पाध्येंचे भावनाप्रधान निरूपण
गदिमा, गुलजार, जावेद अख्तर यांसारख्या दिग्गजांपासून ते वरूण ग्रोवर, मंदार चोळकर आदी नवोदित गीतकार यांच्या गीतांमधील शब्दांतून व्यक्त होणारे भाव व त्याचा मन आरोग्याशी असलेला अर्थ समजावून सांगणारे व त्याचबरोबर शास्त्रीय संगीतातील सूर, पाश्चात्य संगीताचे कॉर्ड्स यातून व्यक्त होणाऱ्या भावभावना विशद करणारे डॉ. अद्वैत पाध्ये यांचे निरूपण उपस्थितांच्या मनाला भिडले. निरूपण करताना डॉ. पाध्ये यांनी स्वत: रचलेल्या अभंगाला तर रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

