लोकसभा क्षेत्रातील म्हाडाचे प्रश्न जनतेला सोबत घेऊनच सोडवणार : खासदार रविंद्र वायकर
‘म्हाडाचे प्रश्न नागरिकांना सोबत घेऊनच सोडवणार’
जोगेश्वरी, ता. ९ (बातमीदार) : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी म्हाडाशी संबंधित पीएमजीपी, आराम नगर, बिंबिसार नगर, खडकपाडा, मोतीलाल नगर आदी विभागांतील प्रलंबित प्रश्न स्थानिक नागरिकांच्या सहभागाने आणि त्यांना सोबत घेऊनच सोडवले जातील, असे आश्वासन दिले आहे. म्हाडा अधिकाऱ्यांसह नुकत्याच झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिले.
जोगेश्वरी (पूर्व) सर्वोदय नगर येथील ३०८ नागरिकांना घरे मिळाल्याशिवाय उर्वरित १०० लोकांना बाहेर काढले जाणार नाही, असे आश्वासन वायकर यांनी दिले. तसेच त्रिचरण प्रकरणाबाबत एसआरए, एमएमआरडीए आणि म्हाडा यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पीएमजीपी येथील रहिवाशांना विश्वासात घेऊनच पुनर्विकास साधला जाईल, असे वायकर यांनी स्पष्ट करत दिंडोशी खडकपाडा पुनर्विकासासाठी रहिवासी आणि विकसक यांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना आणि काम न करणाऱ्या विकसकाला १३/२ नोटीस देऊन बाजूला करण्याचे निर्देश दिले. अंधेरी पश्चिम एसव्हीपी नगर येथील घरांचे हॉटेल/लॉजमध्ये रूपांतर करणाऱ्या ४५ बंगल्यांना नोटीस, २० बंगल्यांवर तोड कारवाई पूर्ण केली असून, उर्वरितांवर पुढील आठवड्यात कारवाई होणार आहे. तसेच आराम नगर पुनर्विकासाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती म्हाडा अधिकाऱ्यांनी दिली.
लोकसभा क्षेत्रातील म्हाडा प्राधिकरणाशी निगडित विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी खासदार वायकर यांच्या पुढाकाराने या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत एकूण १५ महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. म्हाडाचे अधिकारी सानप, उपनिबंधक कटरे, अनिल राठोड, माकणे, तसेच विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत, अल्ताफ पेवेकर, माजी नगरसेविका राजुल पटेल, संजय पवार यांच्यासह विभागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------
जनतेच्या सहभागाशिवाय कोणताही विकास शक्य नाही. म्हाडाशी संबंधित सर्व प्रश्न पारदर्शकपणे आणि स्थानिक नागरिकांना सोबत घेऊनच सोडवले जातील.
- रवींद्र वायकर, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

