आपल्या इच्छेनुसार मरण आपल्या हाती -रामदास भटकळ

आपल्या इच्छेनुसार मरण आपल्या हाती -रामदास भटकळ

Published on

आपल्या इच्छेनुसार मरण आपल्या हाती ः रामदास भटकळ
प्रा. सदानंद वर्दे जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘सन्मानाचे मरण, शेवटचा उंबरठा’ परिसंवाद

मुंबई , ता. ९ : ‘‘मी आज ९५ वर्षांचा आहे तो केवळ डॉक्टरांमुळेच. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही; मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आपल्या इच्छेनुसार मरण आपल्या हाती आले असल्याचे सांगताना आपण निसर्गाशी भांडण का करावे, निसर्गाशी लढा देवू नये, ज्या रुग्णाने मरणाची इच्छा व्यक्त केली असेल, त्याला मेडिकल लाइफ सपोर्ट यंत्रणेवर न ठेवता त्याला नैसर्गिकरीत्या मरण द्यावे, त्यात कुणीही हस्तक्षेप करू नये,’’ असे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत रामदास भटकळ यांनी सांगितले.

प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘सन्मानाचे मरण, शेवटचा उंबरठा’ या विषयावर नुकताच परिसंवाद आयोजित केला होता. परिसंवादाच्या पहिल्या सत्रात वांद्र्याच्या नॅशनल कॅालेजच्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत रामदास भटकळ बोलत होते. यात माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर, लिव्हींग वील बीलचे समर्थक, ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार, प्राध्यापक धडाडीचे युवा लेखक अजित जोशी यांचा सहभाग होता, तर ज्येष्ठ विचारवंत, पॅाप्युलर प्रकाशनाचे संस्थापक रामदास भटकळ या परिसंवादाच्या अध्यक्ष स्थानी होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण प्रा. सदानंद वर्दे यांची मुलगी प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना झेलम वर्दे-परांजपे यांनी केले होते. सॅनफ्रान्सिस्को येथील सोनीकरीमचे संस्थापक उदय दंडवते यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात रंग अमनके, एल्गार साथीचा फोक फ्युजन बॅंड आणि बंकिम सॅान्गकार यांच्या युवा नवगीतांच्या मैफिलीचा कार्यक्रम प्रा. सदानंद वर्दे परिवार आणि मित्रमंडळीने आयेजित केला होता. सुधीर देसाई यांनी उपस्थित रसिक श्रोत्यांचे आभार मानले.

परिसंवादाच्या या कार्यक्रमाला प्रा. अजित जोशी, जस्टीस चंद्रशेखर धर्माधिकारी, जस्टीस हेमंत गोखले, अमरेंद्र नंदू धनेश्वर, निर्मला सामंत, सुधीर देसाई, दिनेश गांधी, ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार भारतकुमार राऊत, नीना राऊत, अजित भुरे, प्रभाकर नारकर, प्रमोद निगुडकर, युवराज मोहिते, सुहिता थत्ते, जगदीश नलावडे, शरद कदम, सतिष चिंदरकर, आशीष जाधव, नंदकुमार पाटील आदी प्रा. सदानंद वर्दे यांचे चाहत्यांबरोबर राष्ट्र सेवा दल आणि जनता दलाच्या काळातील कार्यकर्त्यांची सभागृहात उपस्थिती होती.

-------------
४० वर्षांपूर्वी इच्छामरणाचा ड्राफ्ट बनवला ः कुमार केतकर

‘‘प्रा. सदानंद वर्दे यांनी इच्छामरणाचा जो ड्राफ्ट तयार केला, त्या प्रक्रियेत वर्दे, मी, अरुण साधू, मीनू मसानी होतो. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वयोवृद्धांना जगणं नकोसं होतं, मरण्याची इच्छा असणाऱ्यांना त्रासदायक उपचारामधून मुक्त करण्यासाठी सर्व बाजूंनी विचार केलेल्या ड्राफ्टवर जनमताचा कौल घेतल्यावर प्रा. वर्दे यांनी विधान परिषदेत न मांडण्याचा निर्णय घेतला,’’ असे ज्येष्ठ पत्रकार, माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी इच्छामरणावरील ड्राफ्ट तयार करण्याची प्रक्रिया सांगताना सांगितले.

फोटो : 14838

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com