पनवेल तालुक्यात पशुगणनेत गोधनाची वाढ

पनवेल तालुक्यात पशुगणनेत गोधनाची वाढ

Published on

पनवेल तालुक्यात पशुगणनेत गोधनाची वाढ
म्हैसवर्गात घट; पशुसंवर्धन विभागाच्या योजनांना चालना देण्याची अपेक्षा
कामोठे, ता. १० (बातमीदार) ः प्राणीजन्य आजारांवर नियंत्रण मिळविणे, तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध शासकीय योजना ग्रामीण व शहरी पातळीवर प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने अलीकडेच देशभर पशुधन गणनेची प्रक्रिया पार पडली. या गणनेनुसार पनवेल तालुक्यातील गोधनात वाढ झाल्याचे समोर आले आहे, तर म्हैसवर्गातील पशुंच्या संख्येत घट नोंदली गेली आहे.
२०१८ मधील २० व्या पशुगणनेनुसार पनवेल तालुक्यात एकूण १, ३८, ७९८ पशुधन होते. त्यात गोवर्ग ६,९६४, म्हैसवर्ग ६,२७२, शेळी ९, ०९२, मेंढ्या ८३, वराह (डुकरे) १६९ आणि पक्षीवर्ग (पोल्ट्री) ८१,०४२ इतकी नोंद होती. अलीकडे झालेल्या २१ व्या पशुगणनेत पंचायत समितीचे १७ प्रगणक आणि पनवेल महापालिकेचे ४० प्रगणक यांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित केली. या ताज्या अहवालानुसार, गोधनाची संख्या ७, १३२ वर पोहोचली असून, म्हैसवर्गातील पशु ४, ९४१ इतके नोंदले गेले आहेत. उर्वरित पशुवर्गाची संपूर्ण माहिती अद्याप पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागाकडून प्राप्त झालेली नाही. प्रगणकांना ग्रामीण भागात प्रत्येक तीन हजार आणि शहरी भागात चार हजार कुटुंबांमधील जनावरांची नोंद करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गोशाळा, पांजरपोळ, तसेच कुटुंबातील पाळीव प्राणी, भटकी जनावरे आणि श्वान यांचीही लिंगनिहाय गणना करण्यात आली.
................
पशुपालकांसाठी उपयुक्त उपक्रम
ग्रामीण भागात विविध जातींच्या गायींचे प्रमाण सर्वाधिक असून, म्हैस, शेळ्या आणि कोंबड्यांचे पालनही वाढत आहे. पंचायत समितीमार्फत चालवण्यात येणाऱ्या कासारभाट, तारा, गूळसुंदे, नेरे, शिरढोण, मोर्बे, वावंजे, तळोजा, पारगाव आणि गव्हाण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून शेतकऱ्यांना उपचार व मार्गदर्शन मिळत आहे. पशुगणना ही पशुपालकांसाठी उपयुक्त उपक्रम आहे. या आकडेवारीच्या आधारे पशुपालकांना योजनांचा लाभ मिळेल. शेतकऱ्यांची पशुसंवर्धनातील वाढती रुची ओळखून प्रशासन त्यांना अधिक मदत करू शकेल, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मारकवार यांनी सांगितले.
................
ठिकाण : पनवेल तालुका
गणना वर्ष : २१ वी पशुगणना (२०२५)
मुख्य निष्कर्ष : गोधनात वाढ, म्हैसवर्गात घट
गणना पद्धत : मोबाईल ॲपद्वारे प्रगणकांकडून माहिती संकलन
सहभाग : पंचायत समितीचे १७ आणि मनपाचे ४० प्रगणक
मुख्य केंद्रे : कासारभाट, तारा, गूळसुंदे, तळोजा, पारगाव इ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com