हा २००८च्या हल्ल्याचा सूड!
जयपूर-मुंबई एक्स्प्रेस प्रकरण
हा २००८च्या हल्ल्याचा सूड!
गोळीबारानंतर आरोपीचे उद्गार; साक्षीदाराची न्यायालयात माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : हा २००८मधील हल्ल्यांचा सूड असल्याचे हातात रायफल घेऊन आरोपी चेतनसिंह चौधरीला बोलताना ऐकल्याची साक्ष सोमवारी (ता. १०) जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणातील एका साक्षादाराने सत्र न्यायालयात नोंदवली.
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून वरिष्ठासह तीन प्रवाशांची हत्या केल्याचा आरोप असलेला रेल्वे पोलिस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतनसिंह चौधरी अटकेत असून, सध्या या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. बी. पठाण (दिंडोशी न्यायालय) यांच्यासमोर साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येत आहे. तेव्हा एका साक्षादाराने ही साक्ष नोंदवली.
सुट्टीवरून मुंबईला परतत असताना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक दाढीवाला व्यक्ती आणि जवळच रायफल घेऊन उभा असलेल्या आरोपी सिंहला पाहिले. तो प्रसंग पाहून घाबरल्यामुळे पळण्याच्या प्रयत्नात असताना ‘हा २००८ मधील हल्ल्याचा सूड आहे’ हे वाक्य कानी पडल्याची माहिती साक्षीदाराने दिली. तसेच पुढे आरपीएफ हवालदारला एस-५ कोचकडे जाताना आणि त्यातून रुळांवर उतरताना पाहिल्याचेही अतिरिक्त सरकारी वकील सुधीर सपकाळे यांच्या चौकशीदरम्यान साक्षीदाराने सांगितले. ही साक्ष खोटी असल्याचा दावा सिंहच्या वतीने करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

