वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी वकृत्व स्पर्धा

वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी वकृत्व स्पर्धा

Published on

वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी वकृत्व स्पर्धा
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : किशोरवयीन मुलामुलींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांना विचारमंथनाची सवय लागावी, या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर व नेरूळ शाखेतर्फे शहीद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धा भरवली आहे. सीबीडी बेलापूर सेक्टर १ मधील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सेंट्रल स्कूलमध्ये रविवारी (ता. १६) सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
२०१८ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेला यंदा सात वर्षे पूर्ण होत आहेत. पहिली दोन वर्षे प्रत्यक्ष स्वरूपात, त्यानंतरच्या तीन वर्षे ‘कोविड-१९’ च्या काळात ऑनलाइन पद्धतीने २०२३ पासून पुन्हा प्रत्यक्ष स्वरूपात ही स्पर्धा घेतली जात आहे. यावर्षी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येणार असून, विजेत्यांना पुस्तक स्वरूपात बक्षिसे देण्यात येतील.
-------------------------------
नाव नोंदवण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांनी शहीद भगतसिंगांच्या विचारांवर आधारित सहभागी होऊन समाजात विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करावा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. स्पर्धा आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खुली असून, इच्छुकांना नावे नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com