मुंबई
खारघर सेक्टर ४ मध्ये समविषम पार्किंग
खारघर सेक्टर ४ मध्ये समविषम पार्किंग
खारघर, ता.११ (बातमीदार): खारघर सेक्टर ४ मध्ये वाहतूक कोंडी उद्भवत असल्याने समविषम पार्किंग लागू करण्यात आली आहे. खारघर सेक्टर चार मध्ये मोठ्या प्रमाणात दुकाने वाढली आहेत. पूर्व प्राथमिक वर्ग तसेच माध्यमिक शाळा आहे. दुकानदार तसेच परिसरात वास्तव्य करणारे नागरिक हे रस्त्यावर वाहने उभी करीत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्यामुळे खारघर स्वच्छ फाउंडेशनच्यावतीने खारघर वाहतूक पत्र व्यवहार करून सम विषम पार्किंग योजनेची मागणी केली होती. वाहतूक विभागाकडून केलेल्या पाहणीत परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सोमवार (ता.१०) पासून सम विषम पार्किंगची योजना सुरु केली आहे.

