ठाण्यात राज्यनाट्य स्पर्धेला जल्लोषात सुरुवात
ठाण्यात राज्यनाट्य स्पर्धेला जल्लोषात सुरुवात
राज्यभरात विविध केंद्रात ४०० हून अधिक नाटके सादर होणार
ठाणे, ता. ११ (बातमीदार) : कलावंत आणि तंत्रज्ञांना व्यासपीठ देणाऱ्या ६४ व्या हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धा २०२५-२६ ला जल्लोषात सुरुवात झाली. सोमवार (ता. १०)पासून या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली असून, २ डिसेंबरपर्यंत या नाटकाचे प्रयोग सादर करण्यात येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयने घातलेल्या धुमाकुळामुळे येत्या काही वर्षांत मराठी सिनेमाचं काही खरं नाही, असं प्रतिपादन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे, अभिनेते व व्हॉईसओव्हर आर्टिस्ट उदय सबनीस यांनी व्यक्त केले, मात्र प्रयोगशील रंगमंचीय आविष्काराला त्याचा कुठलाच धोका नसून नाटकाची जागा एआय कधीच घेऊ शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सोमवारी अनेक मान्यवर व प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. ६४ वर्षांचा इतिहास असलेल्या राज्यनाट्य स्पर्धेतून सिनेनाट्य क्षेत्राला गवसलेल्या चेहऱ्यांना कुठलंच आर्टिफिशियल तंत्रज्ञान टक्कर देऊ शकत नाही. नाटक जिवंत आहे आणि तसंच राहील, असेही उदय सबनीस यांनी याप्रसंगी म्हणाले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे उदय सबनीस यांच्यासोबतच अभिनेत्री अमृता फडके, नाट्य परिषद ठाणे शाखा पदाधिकारी प्रणाली राजे, अभिनय कट्टा प्रमुख किरण नाकती, निर्माते संदीप विचारे, समीक्षक संतोष पाठारे आणि ठाणे केंद्राचे परीक्षक लेखक डॉ. समीर मोने, अभिनेत्री अनुया बाम, समीक्षक संजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘ईश्वरसाक्ष’ नाटकाने सुरुवात
जगाच्या पाठीवर एवढी वर्षे अव्याहत अशी ही एकमेव नाट्यचळवळ सुरू आहे. राज्यभरात विविध केंद्रात ४०० हून अधिक नाटके सादर होणार आहेत. याचं श्रेय संपूर्णपणे रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींना जातं, असे ठाणे केंद्राचे स्पर्धा समन्वयक प्रफुल्ल गायकवाड यांनी सांगितले. या स्पर्धेची सुरुवात अॅमॅच्युअर थिएटर, नागोठणे या संस्थेच्या ईश्वरसाक्ष नाटकाने झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

