वाहन क्रमांकासाठी मोजले ६ लाख
वाहन क्रमांकासाठी मोजले सहा लाख
दोन महिन्यांत वाहतूक विभागाला तीन कोटींचा महसूल
पनवेल, ता. ११ (बातमीदार)ः पसंतीचे वाहन खरेदी केल्यानंतर पसंतीचा क्रमांकासाठी परिवहनने ठरवून दिलेले शुल्क अनेक जण भरतात, पण हौसेखातर आपल्या गाडीला आवडता क्रमांक घेण्यासाठी एका वाहनचालकाने तब्बल सहा लाख मोजल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, पनवेलमधील वाहनचालकांमुळे दोन महिन्यांत दोन हजार १७६ वाहनांसाठी तीन कोटी ३२ लाख ६६ हजारांचा महसूल वाहतूक विभागाला मिळाला आहे. नवीन गाडी घेतल्यानंतर पसंतीचा क्रमांक, पूर्ण क्रमांकांची बेरीज आपल्या पसंतीची यावी, यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी अनेकांची असते. आपले वाहन इतरांपेक्षा वेगळे दिसावे, वाहन क्रमांकही लक्षवेधी असावा, अशी हौस अनेकांना असते. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) कोट्यवधीचा महसूल मिळाला आहे. ट्रकच्या सीरिजचा क्रमांक एका हौशी वाहनमालकाला दीड लाखात देण्यात आला, तर पसंतीचा नंबर क्रमांकासाठी हजार रुपयांपासून, तर मेट्रो शहरात चार लाख रुपयांपर्यंत आरटीओकडून आकारले जातात.
-------------------------------
१ नंबर महाग
मोठ्या शहरी भागात ०००१ हा सहा लाखांचा क्रमांक आहे. तोच ग्रामीणमध्ये पाच लाखांत भेटतो. पनवेलकरांमध्ये लकी नंबरचे फॅड असून, सीरिजमध्ये १,१००,७,९,८०५५, ४१४१,४७४७ या क्रमांकाला जास्त मागणी असल्याचे पुढे आले आहे.
----------------------
वाहनधारक लाखो रुपये खर्चून फॅन्सी नंबर घेतात, परंतु तो गाडीवर लिहिताना कलात्मक पद्धतीने बदल करतात. असे नंबर लिहिताना परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार टाकावा, नाहीतर वाहनधारकाला नाहक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
- नीलेश धोटे, सहायक प्रा. परिवहन अधिकारी, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

