महिलांच्या हाती सत्तेची चावी

महिलांच्या हाती सत्तेची चावी

Published on

महिलांच्या हाती सत्तेची चावी
नवी मुंबईत १११ पैकी ५६ महिला सदस्य
वाशी, ता. ११ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत मंगळवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात जाहीर करण्यात आली. २८ प्रभागांतून १११ सदस्यांची निवड केली असून, तब्बल ५६ जागा महिला सदस्यांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिलांच्या हाती सत्तेची चावी राहण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि निवडणूक निर्णय अधिकारी भागवत डोईफोडे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. सोडतीच्या चिठ्ठ्या शालेय विद्यार्थ्यांकडून काढण्यात आल्या. आरक्षण सोडतीवेळी सर्वपक्षीय नेत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, तर इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधुक वातावरण होते. प्रभागनिहाय आरक्षणात अनुसूचित जातींसाठी १० जागा राखीव असून, त्यापैकी पाच महिला जागा आहेत. अनुसूचित जमातींसाठी दोन जागा (एक महिला, एक सर्वसाधारण) राखीव ठेवल्या आहेत. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी २९ जागा असून, त्यापैकी १५ महिला जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, तर सर्वसाधारण प्रवर्गातील ७० जागांपैकी ३५ महिला जागा आहेत. नवी मुंबई पालिकेतील २७ प्रभाग चार सदस्यीय असून, प्रभाग क्रमांक २८ हा तीन सदस्यीय आहे.
----------------------------------
हरकती नोंदवण्याचे आवाहन
- आरक्षणाचे प्रारूप सोमवारी (ता. १७) प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तर सोमवार १७ नोव्हेंबर ते सोमवार २४ नोव्हेंबर (दुपारी ३ वाजेपर्यंत) आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी आहे. हरकती व सूचना नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील नागरी सुविधा केंद्र अथवा सर्व संबंधित आठ प्रभाग समिती कार्यालय येथे सादर कराव्यात, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
- नागरिकांना हरकती नवी मुंबई महापालिका तसेच विभाग कार्यालयामध्ये सादर करता येणार आहे. हरकत आणि सूचना घरात घेतल्यानंतर अंतिम आरक्षणाच्या अधिसूचना जारी केली जाणार आहे. ऑनलाइन स्वरूपात नवी महापालिकेच्या ई-मेलवर पाठवण्यात आलेल्या हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत, असे महापालिका निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
---------------------------
नव्या चेहऱ्यांना संधी
- २०११ च्या जनगणनेनुसार नवी मुंबईची लोकसंख्या ११ लाख ३६ हजार १७० असून, त्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या एक लाख ८३९ आणि अनुसूचित जमातींची १९ हजार ६४६ आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरक्षणात समाविष्ट गटांचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.
- नवी मुंबई महापालिकेचीस २८ प्रभागांतून १११ सदस्यांची निवड होणार आहे. महापालिकेत महिला सदस्यांची संख्या अर्ध्याहून अधिक असल्याने येत्या निवडणुकीत ‘महिला सशक्तीकरणा’चा झंकार उमटणार असून, राजकारणात नव्या चेहऱ्यांना प्रवेशांची संधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com