मालकी हक्काची घरे न मिळाल्यास संघर्ष पेटणार

मालकी हक्काची घरे न मिळाल्यास संघर्ष पेटणार

Published on

मालकी हक्काची घरे न मिळाल्यास संघर्ष पेटणार
म्युनिसिपल मजदूर युनियनचा इशारा
मुलुंड, ता. ११ (बातमीदार) ः मुंबई महापालिकेतील साफसफाई खात्यातील कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत मालकी हक्काची घरे देण्याचा निर्णय २००८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. २००९ मध्ये अशोक चव्हाण सरकारने सह्याद्री येथील कार्यक्रमात १० सफाई कामगारांना प्रतीकात्मकरीत्या घरांच्या चाव्या देऊन या उपक्रमाचा शुभारंभ केला, मात्र या घोषणेला तब्बल १६ वर्षे उलटूनही हजारो कामगारांना घरांचा लाभ मिळालेला नाही.
मालकी हक्‍काची घरे न मिळाल्‍यास संघर्ष पेटेल, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिला आहे.
सरकारने तातडीने कार्यवाही केली नाही, तर आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात तीव्र आंदोलन, बेमुदत, आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे.
कामगारांच्या या मागणीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनने वारंवार आंदोलन, धरणे, मोर्चे आयोजित केले. २०२१-२२ आणि २०२२-२३ मधील आझाद मैदानावरील आंदोलनांनंतर तत्कालीन सरकारने घरांची हमी दिली होती. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वसाहतींच्या पुनर्बांधणीसाठी चार एफएसआयच्या लाभातून सुमारे १४ हजार घरांच्या बांधकामाचा निर्णय घेण्यात आला. काही टॉवरमध्ये कामगारांना घरे मिळाली असली तरी अनेक प्रकल्प रखडले आहेत, तर काहींवर अजूनही काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com