किरकोळ कारणावरून ज्येष्ठाचा अपमान

किरकोळ कारणावरून ज्येष्ठाचा अपमान

Published on

किरकोळ कारणावरून ज्येष्ठाचा अपमान
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर)ः वीजदेयक भरले नसल्याच्या कारणावरून ऐरोलीतील एका ५० वर्षीय व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून पायावर नाक घासून माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
ऐरोली येथे १० वर्षांपासून वास्तव्यास असलेले सुनील जाधव (५०) स्थानिक कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबासह वासू महाजन यांच्या भाड्याच्या घरात राहतात. वासू महाजन यांच्या नातेवाईक असलेल्या स्वाती महाजनकडेच वीजदेयक देण्याची जबाबदारी होती, पण गत महिन्यात जाधव यांना उशिरा पगार मिळाल्याने वीजदेयक भरण्यास विलंब झाला. याच कारणावरून जाधव यांची किरकोळ बाचाबाची झाली, मात्र रात्री साडेअकराच्या सुमारास स्वाती महाजन, विशाल महाडीक जाधव यांच्या घरी आले. त्या वेळी विशाल महाडीकने जाधव यांना बाहेर बोलावून स्वाती ही देवी असल्याचे सांगत तिच्या पाया पडून माफी मागण्यास बजावले, पण जाधव यांनी नकार दिल्याने १७ सप्टेंबर रोजी कामावरून परत येत असताना रोहित महाजन याने जाधव यांना पायावर नाक घासायला लावले. याप्रकरणी शुक्रवारी (ता. ७) रबाळे पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com