ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा
ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा
महापौर पदावर तिन्ही पक्षांचा दावा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ठाणे पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी (ता. ११) जाहीर करण्यात आली. त्यानंतर शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटातील नेते यांनी एकत्र येत, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, महायुती व्हावी, त्यानुसार महायुती होईल, असे म्हणत ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला. असे असले तरी, दुसरीकडे महापौरपदावरूनदेखील तिन्ही पक्षांची मते विभिन्न असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकंदरीतच युतीबाबतच साशंकता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे सेना विरुद्ध भाजप असा राजकीय कलगीतुरा ठाण्यात रंगलेला दिसून येत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीदेखील झाडल्या जात आहेत. असे असताना, मंगळवारी आरक्षण सोडतीच्या निमित्ताने शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले आणि अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला हे नेते एकत्र आल्याचे दिसून आले. केवळ एकत्रच आले नाही, तर त्यांनी महायुतीचा नारादेखील दिला. हा नारा दिला असला तरी अनेकांनी आपल्या मनातील इच्छादेखील बोलून दाखविल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीच्या निमित्ताने महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी तीनही नेत्यांनी वेगवेगळा दावा केल्याचे दिसून आले. आम्ही महायुतीचे घटक आहोत, सर्वांची इच्छा ही महायुतीची आहे. नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर ठाणे जिल्हा महायुतीचा भगवा फडकेल हे निश्चित आहे. तसेच, ठाण्यातही महायुतीचा महापौर बसणार आणि भगवा झेंडा फडकणार असल्याचा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.
ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा
दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनीसुद्धा ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार असल्याचा दावा केला आहे. महापौरपदाबाबत बोलताना लेले म्हणाले, महापौर हे शेवटी संख्याबळावर ठरते. आमचं संख्याबळ जर बहुमताच्या जवळ आले, म्हणजेच ६५ जागांपेक्षा जास्त तर स्वाभाविकच भाजपचा महापौर बसेल. सध्या त्यावर भाष्य करण्याऐवजी आम्ही संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे ते म्हणाले, तर अजित पवार गटानेदेखील महायुतीबाबत भाष्य करताना महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचे सांगताना, त्यात कोणाचा महापौर बसणार हे आमचाच पक्ष निश्चित करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे, तर आमची विचारधारा जरी वेगळी असली तरीदेखील त्याचा महायुतीला फटका बसणार नाही, परंतु महापालिका निवडणुकीत युती होईल की महायुती हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

