पसायदानचा गणराज व जगत माता पारितोषिक वितरण सोहळा साजरा

पसायदानचा गणराज व जगत माता पारितोषिक वितरण सोहळा साजरा

Published on

पसायदानचा गणराज व जगत माता पारितोषिक वितरण सोहळा साजरा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पसायदान चॅरिटेबल संस्थेच्या घरगुती गणपती, सार्वजनिक गणेशोत्सव तसेच सार्वजनिक नवरात्र उत्सव स्पर्धा घेण्यात आली. पसायदानचा गणराज तसेच पसायदानची जगमाता नावाखाली या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेत या वेळी ४७८ घरगुती गणपती तर २९० नवरात्र मंडळांनी सहभाग नोंदवला. गिरगावच्या मराठी साहित्य संघाच्या सभागृहात रविवारी (ता. ९) यातील विजेत्या ३८ मंडळांचा गौरव करण्यात आला. पारितोषिक वितरण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार सचिन अहिर, नरेंद्र राणे, सिद्धिविनायक ट्रस्टचे सदस्य सुदर्शन सांगळे, वैभव गुप्ता, हर्षद स्वार आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी पसायदान संस्थेचे पदाधिकारी, सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन प्रत्येक मंडळाकडून फॉर्म भरून घेणे, पुन्हा जाऊन त्या मंडळाचे परीक्षण करीत एकूण २९० मंडळे या स्पर्धेत सहभागी करून घेतली. पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रीती अमरे, अनघा पेढे, रागिनी पालांडे यांच्यासह पसायदानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज अमरे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले.

विजेती मंडळे पुढीलप्रमाणे

घरगुती गणपती स्पर्धा
प्रथम पारितोषिक - सजावट : प्रशांत म्हात्रे, प्रथमेश निवाते
मूर्ती : करंजीवाला, सागर म्हात्रे

द्वितीय पारितोषिक - सजावट : अभिषेक चिटणीस, मूर्ती : गणेश कदम
तृतीय पारितोषिक - सजावट : कविताताई पाटील, मूर्ती : वाडेकरांचा राजा

उत्तेजनार्थ पारितोषिक - सजावट : संदीप कळदे, नितेश पवार, राजेंद्र चव्हाण
मूर्ती : कृणाल कदम, नीलेश गोताड, मीलनताई कनोजिया
विशेष पारितोषिक - सजावट : मितेश शिरोया

सार्वजनिक नवरात्रोत्सव स्पर्धा
प्रथम पारितोषिक - सजावट : बाल गोपाळ नवरात्रोत्सव मंडळ, बलवीर क्रीडा मंडळ, मूर्ती : बाल गोपाळ मंडळ (सात रस्त्याची माउली), फोर्टची आई मंडळ
द्वितीय पारितोषिक - सजावट : अभ्युदयनगर अंबामाता, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ मूर्ती : राजमाता मंडळ, दक्षिण मुंबईची आई भवानी
तृतीय पारितोषिक - सजावट : नवी चिखलवाडी मंडळ, जय अंबे मंडळ (कॉटनची माउली) मूर्ती : माणिक मंडळ, मुगभाट विकास मंडळ

उत्तेजनार्थ पारितोषिक - सजावट : बाल गोपाळ मंडळ (आई), वीर अभिमन्यू मंडळ, ओवळवाडी समिती (गिरगावची नवसाई), खाडीलकर रोड मंडळ
मूर्ती : अखिल बरोज लेन मंडळ (चिराबाजारची माउली), राधेश्याम मंडळ (कुंभारवाड्याची माउली), चिखलवाडी मंडळ
विशेष पारितोषिक - नवरात्रोत्सव : श्री संतोषी माता मंदिर ट्रस्ट, त्रिमूर्ती उत्सव समिती, मूर्ती : चिराबाजार ताडवाडी मंडळ, खेतवाडी १२वी गल्ली मंडळ

गणेश मंडळे (ऑनलाइन सहभाग)
खत्तर गल्ली, बाल गोपाळ, श्री साईनाथ (फोर्टचा विघ्नहर्ता), निकदवारी लेन (गिरगावचा राजा), परमानंद वाडी, राम निवास, श्री मंगळादेवी, बी. ओ. मार्ग (एल्फिन्स्टनचा राजा), प्रभू गल्ली (चिराबाजारचा महाराजा), श्री पोपटवाडी, बाळ मोरया मंडळ.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com