भारतीय कामगारांच्या जटिल प्रश्नावर आय.एल.ओ.त आवाज उठविला जाईल : सत्यजित रेड्डी
कामगारांच्या प्रश्नावर आय.एल.ओ. मध्ये आवाज उठवणार
सत्यजित रेड्डी यांचे प्रतिपादन
शिवडी, ता. १२ (बातमीदार) : जागतिक कामगार चळवळीत महत्त्वाचे व्यासपीठ समजल्या जाणाऱ्या ‘आयएलओ’मध्ये इंटक श्रेष्ठींनी आजवर भारतीय कामगारांचे यशस्वी प्रतिनिधित्व करून आपले महत्त्व वृध्दिंगत केले आहे. ही गोष्ट लक्षात घेता भारतीय कामगारांच्या जटील प्रश्नावर निश्चितपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठविला जाईल, असे आश्वासन केंद्रीय इंटकचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) त्रिसदस्यीय समितीवर नव्याने निवड झालेले सत्यजित रेड्डी यांनी महाराष्ट्र इंटकच्या सत्काराला उत्तर देताना दिले आहे.
महाराष्ट्र इंटकच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यकारीणीच्या बैठकीत महाराष्ट्र इंटेकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम तसेच सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या उपस्थितीत सत्यजित रेड्डी यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी रेड्डी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
रेड्डी म्हणाले, की एक काळ असा होता, इंटकच्या कोणत्याही सभा कामगार प्रतिनिधींच्या तुडुंब गर्दीने पार पडत, परंतु आज सरकारच्या कामगार विरोधी धोरणातून विविध उद्योगधंद्यात कामगारांची संख्या रोडावली आहे. त्याचा विपरीत परिणाम यासारख्या समारंभावर झालेला दिसतो आहे. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
केंद्रीय इंटकचे उपाध्यक्ष चंद्रप्रकाश सिंग म्हणाले, की आपल्याला बदलत्या काळाचा वेध घेऊन पावले उचलावी लागतील. आजच्या घडीला इंटकचे अस्तित्व महत्त्वाचे असून, ते अधिक शक्तिशाली कसे होईल, तसेच इंटकची ताकद विविध उद्योगधंद्यात कशी वाढेल? यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
केंद्राने ‘फोर कोड बिल संसदेत राक्षसी संख्या बळावर संमत करून कामगार चळवळीपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा केला आहे. त्यावर तसेच राज्य सरकारने जनसुरक्षा आणि कामाची वेळ वाढविण्याचा जे कामगार विरोधी कायदे पुढे आणले आहेत, त्यावर डॉ. कैलास कदम आणि गोविंदराव मोहिते यांनी कडाडून निषेध केला आहे. येत्या नागपूर येथील राज्यस्तरीय अधिवेशनप्रसंगी, याविरोधी महाराष्ट्र इंटकने लढा उभा करण्याचा निर्धार कार्यकरणी केला आहे.
दरम्यान, कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष दिवाकर दळवी, सचिव मुकेश तिगोटे, बजरंग चव्हाण आदींनी कामगारविषयक ठरावांवर आपले विचार मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

