मुंबई
विलेपार्ले येथे “बाल जल्लोष” साजरा होणार!
विलेपार्ले येथे ‘बाल जल्लोष’चे आयोजन
मालाड, ता. १२ (बातमीदार) : विलेपार्ले (पूर्व) येथील सतीश दुभाषी मैदान येथे १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत ‘बाल जल्लोष’ साजरा होणार आहे. साबरी प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, समाजसेवक विनायक सुर्वे आणि त्यांचे कार्यकर्ते हा उप्क्रम राबवणार आहेत. यंदा या आयोजनाचे १८वे वर्ष आहे. लहान मुलांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई आणि उपनगरातील बालगोपाल मोठ्या संख्येने यात सहभागी होतात. आयोजकांनी सर्व पालकांना आपल्या मुलांना या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले आहे.

