मुंबई
दोन वाहनांमध्ये दबून पादचारी ठार
वाडा, ता. १३ (बातमीदार) : तालुक्यातील उचाट गावात असलेल्या कंपनीमध्ये दोन गाड्यांमध्ये येऊन एक पादचारी दबल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. ११) सायंकाळी घडली. श्रवण भोम सिंग (वय ४०) असे मृताचे नाव आहे. उचाट येथे चॅम्पियन रोलिग मिल असून या कंपनीत मालवाहू ट्रक (क्र. एमएच ०४ जीआर १६९१) हा पुढे व त्याच्या पाठीमागे मालवाहू टेम्पो (क्र. एमएच ४८ सीबी ०१५७) या वाहनांवरील चालकांनी वाहने उभी करून ठेवली होती. श्रवण हा दोन्ही वाहनांच्या मधून पायी जाताना ट्रकचालकाने वाहन अचानक मागे घेतले असता दोन्ही वाहनांमध्ये दबल्याने त्याची छाती, कानाला गंभीर दुखापती होऊन तो मृत्यूमुखी पडला. याबाबत कल्लू राजपूत (वय ४५) याच्यावर वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

