टाकाऊतून टिकाऊ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

टाकाऊतून टिकाऊ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

Published on

टाकाऊतून टिकाऊ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
पर्यावरणपूरक विचारांची बालमनात रुजवणूक
माणगाव, ता. १३ (वार्ताहर) : माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेतील पहिलीतील विद्यार्थ्यांनी ‘टाकाऊतून टिकाऊ’ या उपक्रमातून सृजनशीलतेचा आणि पर्यावरणपूरकतेचा सुंदर संगम साधला आहे. वापरात न येणाऱ्या वस्तूंपासून विविध उपयुक्त आणि आकर्षक वस्तू तयार करून या चिमुकल्यांनी कल्पकतेचा आगळावेगळा नमुना सादर केला.
शाळेच्या शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी नारळाच्या करवंट्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या, झाकण, जुन्या कागदांचे तुकडे, बॉक्सेस, तसेच इतर टाकाऊ वस्तूंचा वापर करून शोपीस, तबले, फुलदाण्या, प्राण्यांच्या प्रतिकृती, घरगुती सजावटीच्या वस्तू अशा अनेक आकर्षक निर्मिती केल्या. या सर्जनशील कलाकृतींचे शाळेत प्रदर्शनही भरविण्यात आले, ज्यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाया जाणारेही कोणतीही वस्‍तू उपयुक्त ठरू शकते, हा संदेश पोहोचविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच पर्यावरणपूरक विचार, पुनर्वापराची सवय आणि सृजनशीलता वाढावी, हा आमचा हेतू आहे, असे शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा मोरे यांनी सांगितले.
...................
‘कृतीतून शिकणे’
शाळेमध्ये शिक्षणाबरोबरच ‘कृतीतून शिकणे’ या तत्त्वावर भर दिला जात असल्याने मुलांना व्यवहारज्ञान, सौंदर्यदृष्टी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव या उपक्रमातून मिळत आहे. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या या प्रयत्नाचे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे भावी पिढीमध्ये सृजनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाची बीजे रुजतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com