आमदार राजेश मोरे यांनी केली एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी
राजेश मोरे यांनी केली एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : २७ गावांतील पाण्याच्या सातत्याच्या तक्रारी आणि अनियमित पाणी पुरवठा यावर कायमस्वरूपी उपचार कसा करता येईल. त्यातील नेमक्या अडचणी काय आहेत, या सर्व प्रश्नांची उकल व्हावी म्हणून आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ येथील जांभूळ गावातील एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला २७ गावातील सर्व लोकप्रतिनिधीसमवेत भेट देत पाहाणी दौरा करण्यात आला. यावेळी गाळणी केंद्र (ट्रीटमेंट प्लांट), पाणी संकलन प्लांट, पाणी वितरण केंद्र (डिस्ट्रिब्युशन प्लांट), प्रकल्पातील या सर्व बाबी समजून घेतल्या. शिवाय लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणारा संपूर्ण प्लांट सोलारवर सुरू असल्याचे पाहिल्यावर मोरे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. भविष्यात कसे चांगल्या प्रकारे आणि मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करता येईल यावर सविस्तर आणि सखोल चर्चा केली. यावेळी एमआयडीसीचे उप अभियंता अमोल मसुरकर यांनी सविस्तर माहिती दिली, अडचणी सांगितल्या. यावेळी शिवसेना शहर सचिव तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, माजी नगरसेवक विष्णू गायकवाड, संघर्ष समिती नेते दत्ता वझे, शिवसेना नगरसेवक मुकेश पाटील, प्रकाश म्हात्रे, लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर, विभागप्रमुख विजय भाने, भाजपा नगरसेवक मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, गणेश भाने आणि एमआयडीसीचे इतर अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

