तुर्भ्यात दुभाजकांची दयनियअवस्‍था

तुर्भ्यात दुभाजकांची दयनियअवस्‍था

Published on

तुर्भ्यात दुभाजकांची दयनीय अवस्‍था
शोभेच्या झाडांचा बळी; अनेक ठिकणी कचऱ्याचा ढीग
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) ः तुर्भे परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांची अवस्‍था दयनीय झाली आहे. सुशोभीकरणासाठी लावलेली झाडे आणि झुडपे नष्ट होऊ लागली आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने दुभाजकांचे सौंदर्य वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला, मात्र त्‍याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक ठिकाणी फेरीवाल्यांकडून कचरा टाकण्यात येतो. त्‍यामुळे परिसर विद्रूप होत आहे.
पाम बीच मार्गावरील एपीएमसी वाहतूक पोलिस चौकीपासून माथाडी भवन सिग्नलपर्यंतच्या दुभाजकांमध्ये फेरीवाल्यांनी कायमस्वरूपी बस्तान मांडले आहे. हे फेरीवाले आपल्या विक्रीसाठी आणलेली फळे, भाजीपाला व इतर साहित्य दुभाजकामध्ये ठेवतात. न विकला गेलेल्या व सडलेल्या फळभाज्या दुभाजकांमध्ये टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी तर फेरीवाले कारवाईपासून बचावासाठी आणलेला माल शोभेच्या झाडांमध्ये लपवतात. परिणामी ही झाडे कोमेजून मरत आहेत. याशिवाय एपीएमसी पोलिस ठाण्याजवळील दुभाजकांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्‍यामुळे येथील फुलझाडांची वाढ खुंटली असून, काही मरण पावली आहेत, तर काही ठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिक कचरा व अन्य घाण टाकण्यात आली आहे, तर एपीएमसी सिग्नलपासून सानपाडा महामार्गापर्यंतच्या अनेक दुभाजकांमधील झाडे गायब झाली आहेत. दुभाजकांमधील झाडांच्या देखभालीसाठी नियुक्त ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्याने ही परिस्‍थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com