एचएलएलच्या खारघर येथील हिंदलॅब्सला सीएपी मान्यता

एचएलएलच्या खारघर येथील हिंदलॅब्सला सीएपी मान्यता

Published on

एचएलएलच्या खारघर येथील हिंदलॅब्सला सीएपी मान्यता
सीपीए मान्यता मिळवणारी सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील एकमेव प्रयोगशाळा

नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : नवी मुंबईतील एचएलएल लाइफकेअर लिमिटेड (एचएलएल) संचालित खारघर येथील हिंदलॅब्स प्रयोगशाळेला प्रतिष्ठित कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट (सीएपी)कडून आंतरराष्ट्रीय दर्जाची सीएपीची मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे खारघर येथील हिंदलॅब्स ही सीएपी मान्यता मिळवणारी भारतातील एकमेव सार्वजनिक क्षेत्रातील प्रयोगशाळा ठरली आहे. ही देशातील सार्वजनिक आरोग्यसेवांसाठी अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे.
सीएपी मान्यता ही जगभरात निदान प्रयोगशाळांसाठी सर्वोच्च दर्जाचे प्रमाणपत्र मानले जाते. ती प्रयोगशाळेतील गुणवत्ता नियंत्रण, अचूकता, कर्मचारी कौशल्य आणि रुग्ण सुरक्षेच्या निकषांवर कठोर चाचणी घेऊन दिली जाते. खारघर येथील हिंदलॅब्सने या कसोटीच्या सीएपी ऑडिट उत्तीर्ण करत प्रयोगशाळा व्यवस्थापनात उत्कृष्टतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
एचएलएल ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आहे. गेल्या नऊ वर्षांपासून महाराष्ट्रात एचएलएलमार्फत महालॅब्स सेवा या राज्यव्यापी मोफत प्रयोगशाळा सेवा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १३४ हिंदलॅब्स प्रयोगशाळा दररोज ५०,००० हून अधिक रुग्णांचे नमुने तपासण्यात येत आहेत. तसेच राज्यभरातील ३,६०० हून अधिक सरकारी रुग्णालयांना अचूक व विश्वसनीय चाचणी अहवाल वेळेवर उपलब्ध करून दिले जात आहेत.
या सर्व प्रयोगशाळा आधुनिक चाचणी तंत्रज्ञानाने सुसज्ज, पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यरत असून, गुणवत्ता नियंत्रण व हमीचे काटेकोर पालन करत आहेत. याशिवाय, हिंदलॅब्स नेटवर्कमधील सहा प्रयोगशाळांना एनएबीएल मान्यतादेखील मिळाली आहे. हिंद लॅब्सने २००८ मध्ये दिल्लीतील एका प्रयोगशाळेसह कामकाज सुरू केले होते, मात्र आज त्याचे २० राज्यात २३० हून अधिक प्रयोगशाळांच्या विशाल साखळीत रूपांतर झाले आहे. या प्रयोगशाळांतून आतापर्यंत ८० दशलक्ष हून अधिक रुग्णांना सेवा पुरवण्यात आली आहे.
या मान्यतेमुळे एचएलएलच्या खारघर येथील हिंदलॅब्सने केवळ सार्वजनिक क्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण देशातील निदान सेवांमध्ये गुणवत्तेचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com