‘मॉन्डेलेझ’ची जगप्रसिद्ध बिस्कॉफ कुकीज् भारतात
‘मॉन्डेलेझ’ची जगप्रसिद्ध बिस्कॉफ कुकीज भारतात
मुंबई, ता. १४ : आघाडीच्या स्नॅकिंग ब्रँड्सचे निर्माते आणि बेकर्स असलेल्या मॉन्डेलेझ इंटरनॅशनलने लोटस बेकरीजच्या भागीदारीत भारतात ‘बिस्कॉफ’ आणण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे मॉन्डेलेझ इंडियाने देशात आपल्या प्रीमियम कुकी पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. ‘बिस्कॉफ कुकीजच्या भारतातील पदार्पनाने स्नॅकिंगची व्याख्या बदलेल. जागतिक स्तरावर लोटस बेकरीजसाठी पहिल्यांदाच मॉन्डेलेझ इंडियासारखा भागीदार स्थानिक पातळीवर बिस्कॉफचे उत्पादन करेल.’ अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.
संबंधित भागीदारीअंतर्गत मॉन्डेलेझ इंडिया आपल्या सखोल मार्केटिंग कौशल्याचा आणि व्यापक वितरण नेटवर्कचा वापर करून देशात ब्रँडच्या उत्पादन, मार्केटिंग आणि वितरणाचे नेतृत्व करेल. हा धोरणात्मक टप्पा मॉन्डेलेझ इंडियाच्या मेक इन इंडिया वचनबद्धतेची खात्री देतो. तसेच ग्राहकांना बिस्कॉफ जगभरात ज्या सिग्नेचर कॅरेमलाइज्ड चव, कुरकुरीतपणा आणि गुणवत्तेसाठी ओळखले जाते ती ओळख मिळेल याची काळजी घेईल. असेही कंपनीकडून सांगण्यात आले. मॉन्डेलेझ इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डर्क व्हॅन डी पुट म्हणाले, ‘ही भागीदारी प्रीमियम कुकी विभागातील आमच्या कामगिरीला बळकटी देण्यासाठीचे एक पाऊल आहे आणि लाखो भारतीयांना बिस्कॉफ कुकीज अनुभवाची ओळख करून देण्याची आमची कटिबद्धता दिसते.’ याला दुजोरा देताना लोटस बेकरीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅन बून यांनी सांगितले की, ‘आमचा प्रवास १९३२ मध्ये माझ्या आजोबांनी स्थापन केलेल्या बेल्जियन कौटुंबिक व्यवसायाच्या रूपात सुरू झाला. आज लोटस बेकरीज ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त सूचीबद्ध कंपनी आहे जी अजूनही माझ्या कुटुंबाच्या मालकीची आहे. बिस्कॉफ आता ८० देशांमध्ये पोहोचले असून, अनेक खंडांमध्ये तिचे उत्पादन होते. ‘बिस्कॉफ’ला जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कुकी आणि जागतिक ब्रँड बनवणे. या दृष्टिकोनासाठी भारतात उत्पादन सुरू होणे आवश्यक आहे. मॉन्डेलेझ इंटरनॅशनलसोबत भागीदारी त्यांचे सखोल ज्ञान, उत्कृष्टतेची आवड आणि भारतीय बाजारपेठेतील यश आम्हाला मोठा आत्मविश्वास देते. आता लाखो भारतीय ग्राहकांपर्यंत बिस्कॉफची अनोखी चव आणि वारसा पोहोचवण्यास आम्ही उत्सुक आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

