बस थांब्यांच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांचे हाल

बस थांब्यांच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांचे हाल

Published on

बसथांब्यांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल
विक्रमगड तालुक्यात दुर्लक्षित सुविधा
विक्रमगड, ता. १५ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील बसथांब्यांची (शेडची) अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रवाशांना ऊन, पाऊस आणि वाऱ्यात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बसथांब्यांसारख्या मूलभूत सुविधांच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त आहेत.
पावसाळ्यात शेडमधून पाणी गळते, तर उन्हाळ्यात पुरेसी सावली मिळत नाही. अनेक थांब्यांवरील बाके मोडल्याने प्रवाशांना बसची वाट पाहत तासनतास उभे राहावे लागते. काही ठिकाणी शेडचे लोखंडी खांब गंजून कमजोर झाले असून, धोकादायक स्थितीत आहेत, तर अनेक थांब्यांभोवती कचरा साचला असून, दुर्गंधी पसरते. या गैरसोयीमुळे शाळकरी विद्यार्थी, कामगार आणि महिला प्रवाशांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
विक्रमगड शहराव्यतिरिक्त ओंदे, झडपोली, आपटी, वसुरी, आलोंडे, यशवंतनगर, भोपोली, पाचमाड, साखरे, मलवाडा, टेटवाली, गडदे, दादडे या प्रमुख ठिकाणचे बसथांबे अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवाशांनी तातडीने या थांब्यांची डागडुजी करण्याची आणि स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
--------------------
विक्रमगड तालुक्यात पर्यटन आणि शिक्षणाचे केंद्र वाढते आहे. अशा वेळी प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा निकृष्ट अवस्थेत असणे लाजिरवाणे आहे. प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून बसथांब्यांची दुरुस्ती करावी.
- प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते
--------------------
दररोज सकाळी कॉलेजला जाताना आम्हाला शेडखाली उभे राहावे लागते. पावसात पाणी आत येते, कपडे ओले होतात. प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्ती करावी.
- दीपाली पाटील, कॉलेज विद्यार्थिनी
--------------------
आम्ही प्रवासी दररोज या शेडचा वापर करतो, पण गेल्या काही वर्षांत कुठलीही दुरुस्ती झालेली नाही. खांब गंजले, पत्रे उडालेत. बस येईपर्यंत उन्हात उभे राहणे भाग पडते.
- शंकर भोये, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com