भातखरेदीसाठी शेतकऱ्यांना टोकन वाटप
मुरबाड, ता. १५ (बातमीदार) : एकात्मिक हमीभाव योजनेअंतर्गत सरकारतर्फे भातखरेदी करण्यासाठी मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघातर्फे रविवारी (ता. १६) शेतकऱ्यांची नोंदणी करून टोकन वाटप करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यात चार ठिकाणी पाच केंद्रे उघडण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर शेतकरी सहकारी संघाचे दोन सदस्य आणि दोन कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
मुरबाड तालुक्यात आदिवासी उपविभागातील गावांमध्ये आदिवासी विकास महामंडळ, तर बिगर आदिवासी भागात मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघ भातखरेदी करतो. यावर्षीच्या हंगामातील भातखरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना टोकन देण्यात येईल. गर्दी टाळण्यासाठी चार ठिकाणी विभागनिहाय टोकन वाटपाची व्यवस्था केली आहे. प्रत्येक विभागासाठी नोंदणी केंद्रे केली आहेत. यामध्ये असोळे व देवगाव विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरबाड; शिरवली व म्हसा विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरबाड; कुडवली व शिवले विभाग : गणपती मंदिर, ठाकरे नगर, कोलठण; सरळगाव व किसळ विभाग : श्रीक्षेत्र संगमेश्वर मठ; डोंगरनावे व नारीवली विभाग : सह्याद्री विद्यालय, नारीवली यांचा समावेश आहे.
हंगाम लांबणार
यावर्षी सरकारची भातखरेदी तयारी वेळेत सुरू झाली असली तरी कापणीचा हंगाम मात्र उशिरा पूर्ण होणार आहे. शेतामध्ये पाणी साठणे आणि आडवी पडलेली भात शेते यामुळे कापणी उशिरा होत आहे. हलवार जातीची पिके तयार झाली असली तरी गरवा जातीचे भातपीक अद्याप पूर्णपणे तयार नाही. भात झोडणीसाठी खळ्यामध्ये जागा उपलब्ध नसल्याने शेतकरी शेताजवळच झोडणी करण्यास प्राधान्य देत आहेत.
शेतातील भात कापून खळ्यात आणला आहे; मात्र लोंब्या कमी असून दाणेही भरलेले दिसत नाहीत. त्यामुळे यावर्षी उत्पन्न घटणार असल्याची शक्यता आहे.
केशव हंडोरे, शेतकरी, भादाणे
मुरबाड : तालुक्यातील अनेक भागांत शेतात पाणी साठल्याने भातकापणीला विलंब होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

