कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे पुरोगामी पाऊल !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे पुरोगामी पाऊल !

Published on

कल्याण-डोंबिवलीत पालिकेचे डिजिटल पाऊल
एक खिडकी परवानगी प्रणाली कार्यन्वित
कल्याण, ता. १५ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या केडी स्विफ्ट या प्रणालीचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. १४) करण्यात आले. शहराचा विकास जलद गतीने पारदर्शक व नियोजित पद्धतीने होण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करीत असल्याची, माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली. याप्रसंगी महापालिका अधिकारी वास्तुविशारद, एमसीएचआय अध्यक्ष व इतर मान्यवर यांच्या उपस्थित होते.
महाराष्ट्रात प्रथमच एक खिडकी सुविधा ही प्रणाली विकसित केली आहे. याअंतर्गत इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणालीबरोबरच सर्व प्रकारचे नाहरकत दाखले म्हणजेच अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला, पाणीपुरवठा विभागाचा ना हरकत दाखला, जलनिस्सारण/मलनिस्सारण विभागाचा ना हरकत दाखला, उद्यान विभागाचा ना हरकत दाखला, कर विभागाचा ना हरकत दाखला आदी एक खिडकी योजना या प्रणालीद्वारे उपलब्ध होतील. तसेच या प्रणालीमध्ये डॉशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांना आणि विकसकांना आपल्या अर्जाचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करता येणार आहे. त्यामुळे ही प्रणाली विकसकांसह नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
महापालिकेतील विविध प्रकारच्या विकास परवानग्याकरिता शासनाने बीपीएमएस प्रणाली विकसित केलेली आहे, मात्र याकरिता आवश्यक ना हरकत दाखले हे विहीत कालावधीत आणि एकाच प्रणालीवरून कसे देता येतील, या अनुषंगाने अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून ही प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. याकरीता शासनाचे बीपीएमएस विभागाने केलेले सहकार्य आणि यासाठी वास्तुविशारद, एमसीएचआय आणि महापालिका नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक नगररचना संतोष डोईफोडे, नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपायुक्त समीर भूमकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘हे’ आहेत फायदे
या नवीन प्रणालीमुळे कोणत्याही ना हरकत दाखल्यासाठी व्यक्तीश: महापालिकेत जाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागाला ठरावीक कालमर्यादेत अर्जावर निर्णय देणे बंधनकारक केले आहे. बनावट कागदपत्रांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्रमाणपत्रावर अधिकृत क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्याची सत्यता तत्काळ तपासता येईल. अर्ज दाखल केल्यानंतर २८ दिवसांत नागरिकांना आवश्यक परवानग्या प्राप्त होऊ शकतील.

राज्यातील प्रथमच पालिका
बीपीएमएस आणि एक खिडकी या दोन्ही प्रणाली यशस्वीरीत्या राबविणारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका ठरणार आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या वेळी केले. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रणालीचा वापर करून, महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या वेळी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संतोष डोईफोडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com