विवेकानंद व्याख्यानमाला

विवेकानंद व्याख्यानमाला

Published on

विवेकानंद व्याख्यानमाला
शिवडी, ता. १५ (बातमीदार) ः विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत ६८व्या विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन लालबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, गरमखाडा येथे करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबरला पहिले पुष्प ‘हवामान बदल आणि तरुणाई’ या विषयावर निसर्ग मानसकन्या प्राची शेवगावकर, तर २६ नोव्हेंबरला दुसरे पुष्प हभप डॉ. हरिदास महाराज पालवे शास्त्री ‘श्री संत ज्ञानेश्वर आणि आधुनिक युग’ या विषयावर गुंफणार आहेत. २७ नोव्हेंबरला तिसरे पुष्प ‘भाषा : अभिजात आणि बहुजन’ या विषयावर भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी तसेच २८ नोव्हेंबरला चौथे पुष्प निवृत्त प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख हे ‘आभासी जगातील पालकत्व’ या विषयावर गुंफणार आहेत.
२९ नोव्हेंबरला पाचवे आणि अंतिम पुष्प ‘एआय : भीती की संधी’ या विषयावर माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ चिन्मय गवाणकर गुंफणार आहेत. या व्याख्यानास श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन व्याख्यानमाला प्रमुख मंगेश सावंत यांनी केलं आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com