तेलगळतीने दुचाकीस्वारांची घसरगुंडी
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : उल्हासनगर कॅम्प-३ मधील गुलराज टॉवर मार्गावर शुक्रवारी दुपारी धावत्या ट्रकमधून रस्त्यावर प्रचंड प्रमाणात तेलगळती झाली. काही क्षणांत संपूर्ण रस्ता घसरगुंडीत बदलला. अनेक दुचाकीस्वार घसरताना दिसले. हे सर्व दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले.
उल्हासनगर कॅम्प क्र. ३ परिसरातील गुलराज टॉवर मार्गावर शुक्रवारी दुपारी धावत्या ट्रकमधून अचानक रस्त्यावर तेल सांडल्याने काही सेकंदांतच रस्ता अतिशय घसरडा बनला. दररोज हजारो वाहने धावणाऱ्या या मार्गावर अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीने दुचाकीस्वारांचे अक्षरशः संतुलन बिघडले. अनेक दुचाकी घसरून पडल्या, तर काही वाहनचालकांनी सावरण्याचा निष्फळ प्रयत्न केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत संपूर्ण घटना स्पष्टपणे कैद झाली आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक राजकीय पदाधिकारी व समाजसेवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच वाहने हळूहळू चालवण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या सफाई विभागानेही रस्त्यावर पावडर टाकण्याचे काम सुरू केले. तसेच, वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर पाणी मारून साफसफाई करण्यात आली. त्यामुळे काही वेळातच वाहतूक नियमित होऊ लागली. पोलिसांनी संबंधित ट्रकचालकाची चौकशी सुरू केली असून तेल कसे सांडले, वाहनात तांत्रिक बिघाड झाला होता का किंवा निष्काळजीपणा, याबाबत तपास केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

