उल्हासनगरात सिंधी समाजाची आक्रोश रॅली

उल्हासनगरात सिंधी समाजाची आक्रोश रॅली

Published on

उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : छत्तीसगड क्रांती सेनेचे प्रमुख अमित बघेल यांनी सिंधी समाजाच्या आराध्यदेव भगवान झूलेलाल यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ उल्हासनगरात हजारो बांधवांनी गुरुवारी दुचाकी रॅली काढली होती. या वेळी ‘भगवान झूलेलाल की जय’च्या घोषणांनी शहर दणाणून गेले.
रॅलीची सुरुवात गोल मैदानातील भगवती नवानी स्टेज येथून झाली. त्यानंतर नेहरू चौक, सिरू चौक मार्गे पुढे जात ही भव्य आक्रोश रॅली झूलेलाल मंदिर येथे समारोपास पोहोचली. रॅलीदरम्यान हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या सिंधी समाजातील युवक, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या आवाजात घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला. ‘भगवान झूलेलाल की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. समाजबांधवांनी रस्त्यावरच अमित बघेल यांचे पोस्टर्स जाळत प्रखर निषेध नोंदविला. अनेक तरुणांनी हा केवळ सिंधी समाजाचा नव्हे, तर भारतीय संस्कृती आणि आस्थेचा अवमान आहे. अशा वक्तव्याला कठोर प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे, असे सांगितले.
रॅलीमध्ये धर्मगुरू, संत आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत साई लीलाराम, संत रिंकू भाई साहब, वसंत शाह दरबारचे संत काली साई, संत दीपक सिरवानी, आमदार कुमार आयलानी, शिंदे गट शहराध्यक्ष राजेंद्रसिंग भुल्लर महाराज, विकी भुल्लर, तसेच भाजपचे राजेश वधरिया, राजा गेमनानी, मनसेचे बंडू देशमुख, दीपू छतलानी, दिलीप मिश्रा, भरत गंगोत्री, अमर जगयासी, रोशन पुरुसवानी, प्रदीप रामचंदनी, पिंटो भतिजा, सुनील सिंग (कलवा), बाळा श्रीखंडे आदीसह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला. याशिवाय सिंधी समाजातील अनेक व्यावसायिक, महिला वर्ग, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले.

उल्हासनगर : सिंधी समाजाने अमित बघेल यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com