केळकरांकडून चमत्कार झाला तर फायदा महायुतीलाच

केळकरांकडून चमत्कार झाला तर फायदा महायुतीलाच

Published on

केळकरांकडून चमत्कार झाला तर फायदा महायुतीलाच : मंत्री सरनाईक
सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १५ : आमदार संजय केळकर हे महायुतीचे प्रमुख दावेदार आहेत, त्यांच्याकडून चमत्कार अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी तसा चमत्कार घडवून दाखवावा, असे आव्हान मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. तसेच सध्याच्या घडीला शिवसेनेचे ७८ नगरसेवक असून, ते ८५ ते ९० वर जातील, तर भाजपचेदेखील २० ते २२ असलेले संख्याबळ २५ वर जाईल, असा विश्वास व्यक्त करीत केळकरांकडून चमत्कार झाला, तर त्याचा फायदा हा महायुतीलाच होईल, असे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
महायुती सरकार जनतेच्या प्रश्नांवर ठाम आहे. बिहार व महाराष्ट्रातील महायुती सरकारमुळे विकासाच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे सरनाईक यांनी सांगितले. महाराष्ट्रात महायुतीने २८८ पैकी २२७ जागा जिंकून आपली ताकद सिद्ध केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुती अभेद्य असल्याचेही त्यांनी सांगितले. वनमंत्री मिरा-भाईंदरमध्ये जनता दरबार घेत आहेत, ते चांगले असून, येथील जनतेचे काही प्रश्न आहेत, वनजमिनीवर अतिक्रमणे आहेत, असे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी जनता दरबार घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. पालघरमध्येही जनता दरबार घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सुटत असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय केळकर हे ठाण्याचे आमदार आहेत, ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे ते निश्चितच महायुतीचेदेखील दावेदार असल्याचेही त्यांनी सांगत ठाण्यातही महायुतीची सत्ता आहे. भविष्यातही महायुती होणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे केळकरांनी चमत्कार घडविला, तर त्याचा फायदा हा महायुतीलाच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमची महायुती भक्कम असून, महापालिका निवडणुकीतही ती भक्कम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


लाडकी बहिणींची जास्त काळजी
ज्या ज्या ठिकाणी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद आहेत, त्या सर्व स्तरांवर महिला लोकप्रतिनिधींची संख्या लक्षणीय आहे. ज्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी पुरुष उमेदवार आहे. त्या ठिकाणी महिला नगरसेविकांची संख्या जास्त असेल, तर, लाडक्या भावाला निवडून देण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे आम्ही ‘लाडकी बहिणींची जास्त काळजी घेतो.

राऊत यांची जागा घेण्याचा प्रयत्न
संजय राऊत लवकर बरे व्हावेत, त्यांनी दीर्घायुष्य लाभावे, अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच संजय राऊत यांची जागा घेण्याचा “केविलवाणा प्रयत्न” अंबादास दानवे करत असल्याची टीकाही केली. “संजय राऊत यांची जागा कोणी घेऊ शकत नाही,” असे सरनाईक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com