ठाण्यात गंधार गौरव सोहळा
अभिनेत्री निवेदिता सराफ यांना मानाचा पुरस्कार
ठाण्यात गंधार गौरव सोहळा : अशोक सराफ यांच्या हस्ते प्रदान
ठाणे, ता. १५ (बातमीदार) : गंधार गौरव सोहळ्याच्या दहाव्या वर्षानिमित्त अभिनेत्री निवेदिता सराफ यांना मानाचा गंधार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ११ हजार १११ रुपये रोख रकमेचा हा पुरस्कार त्यांना विशेष समारंभात देण्यात आला. समारंभाला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, आमदार संजय केळकर, अभिनेते विजय पाटकर, मंगेश देसाई, साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ, दिग्दर्शक अभिजित पानसे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. दशकपूर्तीनिमित्त संस्थेतर्फे स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
अभिनेते अशोक सराफ यांनी निवेदिता सराफ यांच्या अभिनयप्रवासाचा गौरव करत म्हटले की, निवेदिताने बालनाट्यातून सुरुवात करून आज उंची गाठली. तिच्या प्रत्येक भूमिकेतील मेहनत तुम्ही ओळखलीत, ही माझ्यासाठीही मोठी गोष्ट आहे. ठाण्याच्या प्रेक्षकांच्या मानांकनाचा आनंद वेगळाच असतो.
आमदार संजय केळकर म्हणाले, गंधारची चळवळ १० वर्षांत उंच भरारी घेत आहे. ठाणे हे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे पदवीभूषण ठरलेल्या अशोक सराफ यांचे योगदान मोठे आहे. बिहार निवडणुकीतील विजयाचा उल्लेख करत त्यांनी, डबल इंजिन सरकारची ताकद जनतेने दाखवून दिली. व्यासपीठावरही सिनेनाट्यसृष्टीचे डबल इंजिन बसले आहे, असे सांगत हास्यस्फोट घडवला.
हा पुरस्कार माझ्यासाठी माहेरची पावती
पुरस्कार स्वीकारताना निवेदिता सराफ म्हणाल्या, आज जे काही झाले ते माझ्या गुरू आणि पती यांच्या कृपेने. त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे हा मोठा सन्मान आहे. माझी अभिनययात्रा सुधा करमरकर यांच्या बालनाट्यातून सुरू झाली. बालनाट्य उद्याचे सुजाण प्रेक्षक घडवते म्हणून हा पुरस्कार माझ्यासाठी माहेरची पावती आहे.
ठाण्यात गंधार गौरव सोहळा :
गंधार बालकलाकार पुरस्कार – स्वरा जोशी
गंधार युवा पुरस्कार – श्रेयस थोरात, शिवानी रांगोळे, शिवराज वायचळ
बालनाट्य संस्था पुरस्कार – संक्रमण, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

