३४ हजारांची ई-सिगारेट जप्त

३४ हजारांची ई-सिगारेट जप्त

Published on

३४ हजारांची ई-सिगारेट जप्त
खारघरमधील पान टपऱ्यांमधून विक्री
नवीन पनवेल, ता. १६ (बातमीदार)ः खारघर शहरात अमली पदार्थांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. अशातच महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या टपरीमधून शनिवारी खारघर पोलिसांनी ३४ हजारांच्या ई-सिगारेट जप्त केल्या आहेत.
ई-सिगारेटची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ई-सिगारेट ही साध्या सिगारेटसारखी दिसते, मात्र ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातले निकोटिन वापरले जाते. ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काडेपेटी लागत नाही. त्यामुळे तरुणांमध्ये त्याचे कुतूहल असल्याने मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर खारघरच्या एका खासगी महाविद्यालयाजवळ ई सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत प्रतिबंधित ई-सिगारेटचा ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी अधिनियम २०१९ चे कलम ४.५.७.८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com