मुरबाडमध्ये ठाकरे युवा सेनेचा मेळावा उत्साहात
मुरबाड, ता. १६ (वार्ताहर) : शिवसेना ठाकरे पक्षाच्या मुरबाड तालुका युवा सेनेचा कार्यकर्ता-पदाधिकारी मेळावा नुकताच शहरातील वैश्य समाज हॉल येथे उत्साहात पार पडला. युवा सेना जिल्हाप्रमुख भूषण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि तालुका युवा अधिकारी राहुल शिंदे यांच्या संयोजनाने हा मेळावा पार पडला.
मेळाव्यात इतर पक्षांमधील अनेक युवक आणि कार्यकर्त्यांनी युवा सेनेत प्रवेश करून पक्षाला मोठी ताकद दिली. विशेषतः राहुल शिंदे यांच्या व्यापक संपर्कामुळे तालुक्यातील इतर पक्षांपासून नाराज झालेले अनेक युवक युवा सेनेत सहभागी होत असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. मेळाव्यासाठी उपजिल्हा युवा अधिकारी राजू डोहळे, जिल्हा सरचिटणीस योगेश भोईर, विधानसभा सचिव महेश सासे, विधानसभा समन्वयक प्रतीक घोलप, उपतालुका अधिकारी खंडू शिंगोळे, चंद्रकांत भोईर, समीर मोहपे, विकास सोमणे, साईनाथ दळवी, सोमनाथ पवार, परेश कुरले, प्रमोद गायकवाड यांच्यासह अनेक युवा सैनिकांनी परिश्रम घेतले. मेळाव्याला मार्गदर्शनासाठी भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सोन्या पाटील, उपजिल्हाप्रमुख मधुकर आप्पा घुडे, ठाणे जिल्हा संघटिका रेखा कंटे, ठाणे जिल्हा सचिव बाळा चौधरी, भिवंडी तालुका सचिव भावेश ठाकरे, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विशे, ठाणे जिल्हा संघटक संतोष सुरोशी, युवा सेना जिल्हा सचिव नितीन सुरोशे, अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष अशपाक बेग, युवक समन्वयक किरण शेलवले, शिवसेना शहरप्रमुख मंगेश भुसारी उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन भरत दळवी यांनी केले.

