२५ लाखांची खंडणी स्वीकारणारी दुकली जेरबंद

२५ लाखांची खंडणी स्वीकारणारी दुकली जेरबंद
Published on

२५ लाखांची खंडणी स्वीकारणारी दुकली जेरबंद
ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : दुय्यम निबंधक अधिकाऱ्याची समाजमाध्यमांत बदनामी करण्याची धमकी देत तब्बल २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या भाईंदर परिसरातील अजय पोपटलाल धोका (४५) आणि मनोज विजय मयेकर (५२) या दोघांना ठाणे शहर खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.

तक्रारदार दुय्यम निबंधक अधिकाऱ्याकडे अजय धोका, मनोज मयेकर आणि पसार असलेला किरण मांजरेकर हे तिघे स्वतःला पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख देत आले होते. या त्रिकुटाने अधिकाऱ्याकडे खोट्या तक्रारी पाठवण्याची, तसेच माध्यमांमध्ये बदनामीकारक बातम्या टाकण्याची धमकी देत २५ लाख रुपयांची मागणी केली. या धमक्यांना कंटाळून तक्रारदारांनी वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ठाणे खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी (ता. १४) कळवा येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचला.

तक्रारदारांकडून २५ लाख रुपये स्वीकारताना अजय धोका याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर सुमारे एक तासाने शुक्रवारी (ता. १४) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मनोज मयेकर याला मिरा-भाईंदर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांनाही उशिरा अटक करण्यात आली. अटक केलेल्या दोघांना शनिवारी (ता. १५) ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू
टोळीतील तिसरा आरोपी किरण मांजरेकर याचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संदीप भोसले, पोलिस हवालदार संजय राठोड, राजाराम पाटील, दीपक गडगे, पोलिस शिपाई संतोष वायकर, विनोद ढाकणे, मयुरी भोसले, भगवान हिवरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Home Guard personnel will drive police Vehicle
solapur rural police action
Pune Robbery News Four Men Attack Cashier with Spray and Escape with Rs 8 Lakh Cash on Sinhagad Road
Solapur crime
Marathi News Esakal
www.esakal.com