सहकाराची अभेद्य ताकद मुंबईसह राज्यात निर्माण करूया
सहकाराची अभेद्य ताकद मुंबईसह राज्यात निर्माण करूया
प्रवीण दरेकर यांचे आवाहन
मुंबई, ता. १६ : सहकाराचे संघटन आणि ताकद दिसल्यावर सरकार आपल्या प्रश्नांकडे बघते. तशा प्रकारची सहकाराची अभेद्य ताकद मुंबईसह महाराष्ट्रात निर्माण करूया, असे आवाहन महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई आयोजित सहकार स्नेहसंमेलन व पतसंस्था परिवार मासिक रौप्यमहोत्सवी स्मरणिका प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. याप्रसंगी बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष शिवाजीराव नलावडे, आमदार प्रसाद लाड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी दरेकर म्हणाले की, कोण कुठल्या जातीचा, पक्षाचा आहे, यापेक्षा सहकाराला ताकद कोण देऊ शकतो हे महत्त्वाचे आहे. ज्या वेळी सभासदांवर विश्वास असतो, तेव्हा कुठलीही ताकद आपल्याला पराभूत करू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील, मुंबईतील सहकार वाचला पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्यासाठी काम करणार आहेत. वसुली प्राधिकरण निर्माण करण्याची मागणी आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारकडे मागणी करून सकारात्मक उत्तर मिळवू, असा विश्वासही दरेकरांनी या वेळी व्यक्त केला.
मुंबई जिल्हा बँकेमार्फत स्वयंपुनर्विकास योजना आणून सर्वसामान्यांचे मोठ्या घराचे स्वप्न सत्यात उतरले. एक जिल्हा बँक सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय बदल घडवू शकते हे करून दाखवले. सहकारातील व्यवहार सहकारात करा. मोठे नेटवर्क असूनही आपण संघटित नाही. आपल्या बँका सक्षम करायच्या असतील, तर आपले पैसे सहकारातच राहायला हवेत, असे त्यांनी सांगितले.
पतसंस्था परिवार मासिक महाराष्ट्रभर न्या
मुंबईचे पतसंस्था परिवार मासिक महाराष्ट्रभर पसरवलात, तर येणाऱ्या काळात सहकाराचे मुखपत्र म्हणून पतसंस्था परिवार ओळखले जाईल, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

