६४७ कोटींची जीएसटी फसवणूक
६४७ कोटींची जीएसटी फसवणूक
महसूल बुडविणाऱ्या दोघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने ६४७.०५ कोटी रुपयांच्या जीएसटी (वस्तू व सेवा कर) फसवणुकीचा पर्दाफाश करीत दोघांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. ११) करण्यात आली. अटक आरोपींमध्ये मे. नरवाल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका रचना प्रभातकुमार माहेश्वरी आणि मे. अभय ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडचे माजी संचालक विपुल प्रभातकुमार माहेश्वरी यांचा समावेश आहे.
जीएसटी विभागाने अलीकडेच बनावट बिले आणि खोट्या व्यवहारांद्वारे सरकारी महसूल बुडविणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत दोघांनी आठ बनावट कंपन्या तयार केल्याचे आढळले. धक्कादायक म्हणजे या कंपन्यांमध्ये कार्यालयातील शिपाई आणि चपराशांना संचालक म्हणून दाखविण्यात आले. या कंपन्यांच्या नावावर ३२८.८९ कोटी रुपयांची खोटी बिले तयार करण्यात आली तसेच ३१८.१५ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिटही बेकायदा घेतले गेले. अटक केलेल्या रचना माहेश्वरी आणि विपुल माहेश्वरी यांना एस्प्लेन्ड कोर्ट क्र. १९ मध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई अन्वेषण-अ विंगने केली. राज्य कर सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि राज्य कर उपायुक्त रमेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्य कर आयुक्त धनंजय कटकदौंड, डॉ. रोहन आहेर, अनिल मुंढे, संजय सोनवणे आणि राज्य कर निरीक्षकांच्या पथकाने तपास पूर्ण केला. विविध डेटा स्रोत आणि विश्लेषण साधनांचा वापर करून ही फसवणूक उघडकीस आणण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

