वसई विरारकरांना मिळणार मेट्रो बरोबरच रस्ता
वसई-विरारकरांना मेट्रोबरोबरच रस्ता
नायगाव, भाईंदर खाडीवर डबल डेकर, दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन बनवणार प्रकल्प अहवाल
संदीप पंडित, सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. १६ ः मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात वाहतूक सुधारण्याकरिता वसई-भाईंदरावरील पुलाचे बांधकामात करण्यात येणार होते. मुंबई महानगरांत वसई-भाईंदर क्षेत्रातून रोज लाखो नागरिक कामानिमित्ताने ये-जा करीत असतात. हा प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता या ठिकाणी मेट्रो आणि रस्ता असा डबल डेकरचा प्रस्ताव दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन तयार करीत असल्याचे समजते.
नायगाव-भाईंदर खाडीवर प्रस्तावित पुलाच्या कामात भाईंदर ते वसई मेट्रोचा समावेश केल्यास वाहतूक कोंडीच्या समस्येसोबत राष्ट्रीय महामार्ग ८ वरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे प्रवासासाठी बोटीवर अवलंबून राहणाऱ्या पाणजू बेटावरील नागरिकांचा प्रवासदेखील या पुलामुळे सुखकर होण्यास मदत होणार आहे. भाईंदर येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत मेट्रो आली असल्याने त्या ठिकाणाहून पुढे वसई-विरारकडे मेट्रोचा विस्तार करण्यात येणार असून, वसई-विरारकरांची रस्त्याच्या मागणीबरोबरच मेट्रोची मागणीही लवकरच पूर्ण होण्याचे चित्र दिसत आहे. मेट्रो आणि रस्ता, डबल डेकरचा प्रस्ताव तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन तयार करीत असून, त्याला लवकरच अंतिम स्वरूप मिळणार आहे.
सद्य:स्थितीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास मुंबई पश्चिम उपनगर ते भाईंदर (पश्चिम)दरम्यान मेट्रोचे काम देण्यात आले आहे. मेट्रोचे कारशेड भाईंदर पश्चिम उत्तन रोड सुभाषचंद्र बोस मैदान येथे बांधण्यात येणार आहे. या कारशेडलगत भाईंदरकडील प्रस्तावित पोहोच मार्ग आहे. या सर्व बाबींचा विचार करता बांधकामामध्ये भाईंदर ते वसई मेट्रो कामाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार हितेंद्र ठाकूर हे २००७ पासून सातत्याने करीत आहेत. त्या मागणीला आता यश येणार असल्याचे बोलले जात आहे.
==============================================
मी नगराध्यक्ष असताना १०० कोटी रुपये पुलासाठी खर्च येणार होता. तर मी महापौर असताना हाच खर्च जवळपास ९०० कोटी रुपयांवर गेला होता. आता तर तो १,५०० कोटींच्या वर गेला आहे. आमचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने या पुलाची आणि मेट्रोची मागणी लावून धरली आहे. त्याला आता यश येत आहे. आम्ही मेट्रोच्या मार्गावर पाणजू येथे स्टेशन देण्याची मागणीही केली आहे. ती पूर्ण झाल्यास या बेटावरील नागरिकांना प्रवास करण्यास बरे होणार आहे.
- नारायण मानकर, माजी महापौर, वसई विरार महापालिका
-------
विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत नायगाव-भाईंदरदरम्यानच्या वसई खाडीवरील पुलासाठी प्राधिकरणाच्या एका बैठकीत १०० कोटी खर्चास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर ते काम रखडल्यानंतर प्राधिकरणाच्या १३७व्या बैठकीत या पुलासाठी ८७५. ५४ एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आली होती. तर प्राधिकरणाच्या १४४व्या बैठकीत (१२/१/२०१८)च्या याच कामासाठी १,५०१ इतक्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली होती. आता हेच काम त्याही पुढे जरा असून, याबाबतचा मेट्रो आणि रस्त्याचा अहवाल तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन करीत आहे.
===================================================
२००७साली १०० कोटींचा अंदाजे खर्च येणार होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २०१५मध्ये ९७५ कोटींचा निधी मंजूर झालेला असतानाही पुलाचे काम सुरू झाले नाही. या दिरंगाईमुळे आता तर या पुलाचा खर्च हा १,२०० ते १,५०० कोटींवर जाणार असल्याचे बोलले जात आहे. आजमितीस काम सुरू झालेले नाही, तरी पुलाच्या कामाला प्राधान्य देऊन त्या कामामध्ये भाईंदर ते वसई मेट्रो कामाचा समावेश करण्याची मागणी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एमएमआरडीएच्या आयुक्तांकडे केली आहे.
==============================================
महाराष्ट्र सागरीकिनारा नियंत्रण प्राधिकरण (MCZMA) यांची दि. ०२/०५/२०१७ रोजी परवानगी प्राप्त झाली आहे.
राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण (SEIAA) यांची दि.०२/०८/२०१७ रोजी परवानगी प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांची दि. २८/०७/२०१६ रोजी परवानगी प्राप्त झाली आहे.
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (IWAI) यांची दि. १५/०२/२०१७ रोजी परवानगी प्राप्त झाली आहे.
कांदळवन कक्ष, मुंबई व ठाणे वन विभाग संबंधित आहेत. कांदळवन कक्ष क्षेत्रात प्रकल्पाच्या एकूण ३.४४ हेक्टरपैकी भाईंदरमधील २.४४ हेक्टर कांदळवन कक्ष मुंबई वनक्षेत्र मोडत आहे तसेच पाणजू बेट व नायगाव वन विभाग सुमारे एक हेक्टर वन क्षेत्र मोडत आहे.
============================================
सुभाषचंद्र बोस स्टेडियम ते वसई-विरार ग्लोबल सिटी असा २६ कि.मी.चा उन्नत मार्ग आहे. या पर्यायामध्ये मेट्रो मार्गिका-१३ ही मेट्रो मार्गिका-९ला जोडलेली आहे. या मार्गिकेमध्ये (पर्याय क्र. १) मेट्रो मार्गिका १३ ही खाडी ओलांडून जाते. तसेच नायगाव-भाईदरदरम्यान वसई खाडीवर दुपदरी पुलाचा प्रस्ताव आहे. हे दोन प्रस्ताव एकत्रित केले, तर रोड आणि मेट्रोचा एकत्रित एकच (दुमजली) खाडीपूल बनेल. हा पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच विविध परवानग्या मिळण्याच्या दृष्टीने चांगला पर्याय आहे. त्याचप्रमाणे मेट्रो प्रकल्पामध्ये दुमजली खाडीपूल (Road-Cum-Metro Bridge) बांधल्यास सर्व खर्च मेट्रो प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार आहे.
==================================================
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

