शासकीय योजनांमधून सक्षमीकरणाचा मार्ग

शासकीय योजनांमधून सक्षमीकरणाचा मार्ग

Published on

शासकीय योजनांमधून सक्षमीकरणाचा मार्ग
पनवेल पालिकेचे महिला, मुलींना लाभ घेण्याचे आवाहन
कामोठे, ता. १७ (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये वास्तव्य असणाऱ्या महिला, मुली, १८ वर्षांखालील बालकांसाठी विविध उपयुक्त योजना महिला व बालकल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
पनवेल महानपालिका महिला व बालकल्याण विभागातर्फे अ, ब, क, ड या प्रभागनिहाय मुलींना, महिलांना चारचाकी वाहन शिकाऊ परवान्यासह चालविण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत कर्करोगाने ग्रस्त असलेल्या महिलांना व मुलांना, मुलींना ५० हजार रुपयांचे फक्त एकदाच अर्थसहाय्य दिले जाणार आहे. राज्य व राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य असलेल्या खेळासाठी वैयक्तिक व सांघिक स्तरावर मुलींना अर्थिक मदत करणे, वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस, बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.डी.एस. शिक्षण घेणाऱ्या मुलींना प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती तसेच विविध स्पर्धा परीक्षाकरिता अर्थसहाय्य देण्याकरिता १ एप्रिल २०२५ नंतर पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या, मुख्य परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थिनींसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
़़़़़़़़़़़़़ः-------------------------
संकेतस्थळावर संपर्क साधा
अनाथ, निराक्षित मुलींना दत्तक घेतलेल्या पालकांसाठी प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. १ किवा २ मुलींवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांना फक्त एकदाच प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. योजनांबाबतच्या अर्टी-शर्ती पनवेल महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त महेश मेघमाळे यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com