गाढीपुलावर अपघाताचा धोका

गाढीपुलावर अपघाताचा धोका

Published on

गाढीपुलावर अपघाताचा धोका
जुन्या मार्गिकेचे संरचनात्मक परीक्षण कागदावरच
नवीन पनवेल, ता. १७ (बातमीदार)ः रायगड जिल्ह्यात ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्वच धोकादायक पुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश परिवहनमंत्र्यांनी दिले होते, मात्र पनवेल-उरण मार्गावरील गाढी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाकडे प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्याने भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पनवेलमधील पनवेल-उरण रस्त्यावरील गाढी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल शेवटची घटका मोजत आहे. पनवेल शहरातून उरण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर १९२७ मध्ये दळणवळणासाठी ब्रिटिशांनी या पुलाची निर्मिती केली होती. त्यामुळे पुलाची कालर्मयादा संपली असून, वाहतुकीसाठी योग्य नसल्याने २०१६ मध्ये वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. २००६ मध्ये या धोकादायक पुलाला समांतर दोन मार्गिकेच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. सध्या या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे, पण जुन्या ब्रिटिशकालीन पुलाचे संरचनात्मक परीक्षण गरजेचे आहे. या पुलावरून वाहतूक बंद केली असली तरी धोकादायक पुलावर वाहनांचे पार्किंग केले जात आहे. याबाबत करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, सामाजिक कार्यकर्ते कुणाल लोंढे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व सिडकोकडे पूल दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी केली आहे, मात्र सिडकोने दुर्लक्ष केल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वाढली आहे.
---------------------
नोकरदारांची गैरसोय
पनवेल उरण रस्त्यावरील गाढी नदीवरील पुलावर वाहनांची संख्या वाढल्यामुळे कोंडी होते. करंजाडे येथून सकाळी मुंबईकडे कामाला जाणाऱ्या नोकरदारवर्गाची गैरसोय होत असल्याचे शुभम केदारे यांनी सांगितले, तर उरण नाक्यावरील जुना पूल बंद असल्याने एकाच पुलावरून दोन्ही मार्गाने वाहतूक असल्याने सिडको अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी प्रवासी बळीराम पाटील यांनी केली आहे.
------------------------
अवजड वाहनांची वाहतूक
उरण-पनवेल रोडवर गाढी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची परिस्थिती धोकादायक झाली आहे. या पुलाचे संरचनात्मक परीक्षण करण्याकरिता बंद करण्यात आला आहे. या पुलावरून येणे-जाणे पुलावर अवजड वाहनांना थांबण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. या पुलावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-------------------------
परीक्षणासाठी तीन महिन्यांचा अवधी
गाढी नदीवरील पूल धोकादायक असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाचे संरचनात्मक परीक्षण करण्याबाबत तांत्रिक प्रक्रिया सुरू असून, तीन महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण करणार असल्याचे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत काटकर यांनी सांगितले.
------------------
पूल आयुर्मान - ९८ वर्षे
लांबी - १५० मीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com