कोकणच्या शेतमालाचा वसईकरांना गोडवा

कोकणच्या शेतमालाचा वसईकरांना गोडवा

Published on

वसई, ता. १७ (बातमीदार) : सध्याच्या जंक फूडच्या जमान्यात सकस, पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष होते. अनेक कंदमुळाची माहिती नव्या पिढीला माहीत नाही. वसईतील निर्मळ यात्रेत कोकणातील शेतमाल दाखल झाला असून, शरीरासाठी गुणकारी असलेल्या कंदमुळांना माेठी मागणी आहे.

वसईच्या यात्रेत कोनफळ, कनक, रताळी यासह अन्य कंदमुळे इंदापूर, पेण, पाली, मंडणगाव या भागातून व्यावसायिकांनी टेम्पोने वाहतूक करून आणली आहेत. त्यामुळे वसईसह कोकण आणि अन्य भागातील शेतकऱ्यांना वसईच्या यात्रेनिमित्त अर्थार्जनाचा मार्ग मिळाला आहे. अवकाळी पावसाचा फटका बसला. या शेतमालाचा भाव वधारला आहे, परंतु विक्रेत्यांनी ग्राहकांना सकस पौष्टिक खाद्य मिळावे, यासाठी विक्रीसाठी दुकानात ठेवली आहेत. त्यामुळे जंक फूडपेक्षा अधिक चांगली, चविष्ट आणि आरोग्यदायी कंदमुळांना पसंती दिली जात आहे. यात्रेच्या निमित्ताने फायबर, जीवनसत्त्व, रोगप्रतिकारशक्तीत वाढ याबाबतची माहितीसह फायदे तरुणाईला ज्ञात होऊ लागले आहेत.

आकाश पाळण्याची सफर
निर्मळ येथे उंच आकाश पाळणे, लहान मुलांसाठी छोटे पाळणे, तसेच विविध प्रकारची खेळणी, तसेच खाद्यपदार्थांत शिंगाडे, भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा भाविकांना आकर्षित करत आहेत. भाविकांसाठी दुकाने सज्ज झाली आहेत. त्यामुळे व्यवसायाला तेजी येणार, अशी आशा दुकानदारांना निर्माण झाली आहे.

सुकेळीला भाविकांचा पसंती
वसईची सुप्रसिद्ध सुकेळी निर्मळच्या यात्रेत दाखल झाली आहेत. केळीच्या पानात बांधणी करून घरीच तयार करण्यात आली आहेत. नैसर्गिकरीत्या पिकवल्या जाणाऱ्या सुकेळीची चव जिभेवर रेंगाळत राहते. त्यामुळे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. वसई निर्मळ, आगाशी, नंदाखाल, नाळे, वाळुंजे, कोफराड या ठिकाणी शेतकरी आजतायागत व्यवसाय करत आहेत.

कोकण, तसेच अन्य भागातून कोनफळ, कनक, रताळी यासह अन्य शेतमाल वाहतूक करून आणला आहे. गतवर्षीपेक्षा भाव वाढला आहे, मात्र ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. निर्मळ यात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवसांत ग्राहकांची संख्या वाढेल, अशी आशा आहे.
- माया देवकर, व्यावसायिक, वसई

कंदमुळे भाव (प्रतिकिलाे)
कनक २००
कोनफळ १५०
सुकेळी ८०० ते ७००
रताळी १००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com