कळवा - मुंब्र्यात कचरा प्रश्न पेटला
कळव्याचा कचरा आयुक्तांच्या दारात
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन!
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा आणि मुंब्रा शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याची समस्या गंभीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १७) थेट महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. कळवा, खारेगाव, पारसिक नगरसह इतर भागांत रस्त्यावरील कचरा आठ-आठ दिवस उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कचरा समस्येविरोधात संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कळव्यातील कचरा एका डम्परमध्ये भरला आणि तोच कचरा महापालिका मुख्यालयाच्या दारात आणून टाकला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष अभिजित पवार यांनी पालिका प्रशासनाला इशारा दिला, की कळवा भागातील कचरा यापुढे नियमित उचलला जावा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल. दुसरीकडे मुंब्रा भागातील कचरा समस्येविरोधातही शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.
राजकीय वातावरण तापले
माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यासह सिराज डोंगरे, सुधीर भगत, फरजाना शाकीर शेख, सुनीता सातपुते, हिरा पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ‘हेच आहे स्वच्छ भारत अभियान?’ असे बॅनर झळकवत कचरा तत्काळ उचलण्याची मागणी केली. एकूणच दोन्ही शहरांमध्ये कचरा कोंडी झाल्याने ठाणे महापालिका प्रशासनाविरुद्ध राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

