कार पार्किंगच्या वादातून दोन गटात हाणामारी,
पार्किंगच्या वादातून दोन गटांत हाणामारी
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : नेरूळमधील शिरवणे परिसरात कार पार्किंगच्या किरकोळ वादातून शनिवारी रात्री (ता. १५) दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ रविवारी (ता. १६) समाजमाध्यमांवर व्हायरल होताच नेरूळ पोलिसानी संबंधिताची पडताळणी करून दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल झालेला या हाणामारीचा व्हिडिओ रविवारी दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.
नेरूळमधील शिरवणे परिसरातील लैला बारजवळ दोन गटांमध्ये हाणामारी झाली. शनिवारी (ता. १५) घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नेरूळ पोलिसांनी त्याआधारे केलेल्या चौकशीत रवि पाटील उर्फ रवि शेट्टी, अंकुश द्विवेदी, नरेश मेहता, सफदार सय्यद अली, देवेंद्र चंद्रकांत गरुडे, राहुल विश्वनाथ पवार, रमण सिताराम तोरसकर व त्यांच्या साथीदारांमध्ये हा राडा झाल्याचे सांगितले आहे.
कार पार्किंगच्या कारणावरुन सुरू झालेला त्यांच्यामधील वाद काही क्षणातच हातघाईवर गेल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही गटांतील तरुण एकमेकांना शिवीगाळ व मारहाण करताना आढळून आले. याची दखल घेत दोन्ही गटांविरोधात सार्वजनिक ठिकाणी जमाव करून भांडण करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि प्लॅस्टिक पाइपसारखी साधने बाळगून दहशत निर्माण करणे, तसेच नवी मुंबई पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदर व्हिडिओतील आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

