ओळखीसाठी मोजा २५ रुपये

ओळखीसाठी मोजा २५ रुपये

Published on

ओळखीसाठी मोजा २५ रुपये
‘आधार’ अद्ययावतीकरणासाठी शुल्कवाढ
नवीन पनवेल, ता. १८ (बातमीदार)ः भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण कार्यालयाने १ ऑक्टोबरपासून आधार नोंदणी, अद्ययावतीकरण सेवांसाठी २५ रुपयांची शुल्कवाढ वाढ केली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
भारतातील प्रत्येक रहिवाशासाठी आधार कार्ड सक्तीचे आहे. नवजात बालकापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आधार नोंदणी होते. हा तपशील अद्ययावत ठेवणेदेखील गरजेचे असते. आधार नोंदणी तसेच अद्ययावतीकरणाच्या सेवेमध्ये १ ऑक्टोबरपासून नवीन शुल्क घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, शेतकरी, लाडक्या बहिणींसह सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. बँकेचे खात्याशी आधार सलग्न करणे बंधनकारक असल्याने सातत्याने बदल अपेक्षित आहे. पण आता नवीन शुल्कवाढीमुळे ५० रुपयांचे शुल्क थेट ७५ रुपयांवर जाणार आहे.
------------------------------
४० ते ५० टक्क्यांपर्यंत दरवाढ
नवीन दर ३० सप्टेंबर २०२८ पर्यंत लागू असतील. नवीन आधार नोंदणी ही पूर्वी मोफत होती. ५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक अद्ययावतीकरण मोफत ठेवण्यात आले. इतर बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाचे शुल्क पूर्वी १०० रुपये होते. आता १२५ रुपये करण्यात आले आहे. तसेच पत्ता, ओळखीचा पुरावा, दस्तऐवज अद्ययावत आधार नोंदणी केंद्रामध्ये किंवा पोर्टलवरील शुल्क ५० ऐवजी ७५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
-----------------------
दरफलक लावणे बंधनकारक
आधार केंद्रावर दर्शनी भागावर सुधारित दरांचे फलक लावणे केंद्रचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच अतिरिक्त शुल्क आकारल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतची तक्रार तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार शाखा येथे करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com