ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची रेकॉर्ड ब्रेक कामागिरी
ठाण्यात चोरट्या मद्य वाहतुकीवर प्रहार
एकूण ११ महिन्यांत २५.६८ कोटींचा मुद्देमाल जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी
ठाणे शहर, ता. १८ (बातमीदार)ः ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने रेकॉर्ड ब्रेक कामागिरी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १० कोटी ४२ लाखांचा जादा मुद्देमाल जप्त करून मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई थेट ७० टक्क्यांनी वाढली असल्याने या विभागाचे कौतुक केले जात आहे. विभागाकडे खबऱ्यांचे सक्षम जाळे, दक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांची फौज असल्याने चोरटी वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये दहशत पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
इतर राज्याला जोडणारे अनेक मुख्य महामार्ग ठाणे जिल्ह्यातून जात असल्याने या मार्गांवरून मोठ्या प्रमाणात अनधिकृत मद्याची वाहतूक होत असते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग या महामार्गांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवून असतात. त्यामुळे कोट्यवधींचा महसूल बुडवू पाहणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या उत्पादन विभागाकडून आवळल्या जातात. परराज्यातून ठाणे, मुंबईत चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी विशेष पथके तयार केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून सापळे लावून गुन्हेगारांना पकडण्यात येते. त्यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या ११ महिन्यांत ठाणे विभागाने २५ कोटी ६८ लाख ६४ हजार ३९८ रुपये किमतीचे परराज्यातील मद्य, बनावट स्कॉच आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणे, मुंबई, पालघर, वसई, गुजरात आदी भागात विक्रीसाठी हे मद्य वितरित होणार होते.
१ सप्टेंबर (२०२४) ते ३१ ऑक्टोबर २०२५ मधील कारवाई
एकूण गुन्हे - ४९५६
संशयित अटक - ३८५७
वाहने जप्त - ३६८
परराज्यातील जप्त मद्य - ५,८७,४६,१९९
बनावट स्कॉच जप्त - २,०४,८६,९४९
एकूण मुद्देमाल किंमत - २५,६८,६४,३९८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
