वीर धुमालच्या भेदक गोलंदाजीने सिंघानिया स्कूलची हॅरिस शिल्डमध्ये पुढील फेरीत प्रवेश..
वीर धुमालचा भेदक मारा
सिंघानिया शाळेचा सेंट सबेस्टियनवर विजय
ठाणे, ता. १८ (बातमीदार) : हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया शाळेने दमदार विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. डावखुरा फिरकी गोलंदाज वीर धुमालने केवळ १२ धावांत पाच बळी घेत केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे सेंट सबेस्टियन विद्यालयाचा संपूर्ण डाव १५१ धावांत आटोपला. त्याला अद्वैत कचराजने ४४ धावा देत तीन फलंदाज बाद करून उत्तम साथ दिली.
सेंट सबेस्टियनकडून रिझवान शेखने ५६ धावा करत अर्धशतक ठोकले, तर आर्यसन पडवळने २९ आणि झयान बाबजीने नाबाद २४ धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र वीरच्या वेगवान आणि अचूक गोलंदाजीपुढे त्यांच्या फलंदाजांना दीर्घकाळ तग धरणे जमले नाही. १५२ धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताना सिंघानिया स्कूलच्या विवान हजारे आणि देवांश शिंदेने पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची महत्त्वाची भागीदारी देत संघाचा पाया भक्कम केला. विवानने ३० तर देवांशने ४४ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर संघाची मधली फळी थोडी डळमळली, मात्र खालच्या क्रमांकातील फलंदाजांनी संयमित खेळ करत आठ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारत दोन गडी राखून विजय मिळवला. या लढतीत प्रभावी गोलंदाजीसाठी वीर धुमाल ‘सामनावीर’ ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
