झेडपीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
नशामुक्त भारत अभियान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या नशामुक्त भारत अभियानच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषद मुख्यालयात मंगळवारी (ता. १८) अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नशामुक्ती शपथ घेतली.
जिल्हा परिषदेतील शपथ विधी कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, समाजकल्याण विभागप्रमुख आणि कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी उज्वला सपकाळे आदींनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेत, व्यसनमुक्त व निरोगी समाज घडविण्याचा संकल्प व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन व्यसनमुक्त जिल्हा घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे.

