ससून डॉक परिसरातील गोदामे बंद

ससून डॉक परिसरातील गोदामे बंद

Published on

ससून डॉक परिसरातील गोदामे बंद
स्‍थानिक मच्छीमारांचा मोर्चा काढण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : ससून डॉक परिसरात गेल्या काही दिवसांपासून मत्स्य व्यावसायिक आणि कामगारांमध्ये मोठी चिंता आहे. कोट्यवधी रुपयांचा व्यापार आणि हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या बंदरावर अवलंबून आहे. अशातच मुंबई पोर्ट ट्रस्टने काही येथील काही गोदामे सोमवारी (ता. १७) अचानक बंद केल्याने स्थानिक मच्छीमार संतप्त झाले आहेत. ससून डॉकमधून स्थानिक मच्छीमारांना हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून, याविरोधात विराट मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिकांनी दिला.


स्थानिक मच्छीमार संघटनेचे नेते कृष्णा पवळे यांनी सांगितले की, ‘ससून डॉकमधील ब्रिटिशकालीन गोदामे ही मुंबई पोर्ट ट्रस्टची मालमत्ता आहे. पोर्ट ट्रस्टने ती महाराष्ट्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाला भाडेकराराने दिली. राज्य सरकारने पुढे ती मत्स्य व्यावसायिकांना भाड्याने दिली. आम्ही भाडे नियमित भरतो, पण राज्य सरकारकडून ते पोर्ट ट्रस्टकडे जमा झाले नाही. आता त्याचा फटका आम्हाला बसत आहे. दोन दिवसांपूर्वी पोर्ट ट्रस्टने पोलिसांच्या संरक्षणात ही गोदामे बंद केली. यामध्ये आमची लाखो रुपयांची सामग्री अडकली आहे. कामगारांचा रोजगार थांबला. एका कारवाईमुळे हजारो कुटुंबांवर संकट आले.’ यापूर्वीही पोर्ट ट्रस्टने ससून डॉकचा वीजपुरवठा काही काळ बंद केला होता. त्या वेळी कोळंबी प्रक्रिया उद्योगांनी तग धरला, पण आता गोदामे बंद झाल्याने पूर्ण कामकाज थांबण्याची वेळ आली आहे. आमचा व्यवसाय करायचा तरी कुठे, असा सवाल पवळे यांनी विचारला.


मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेचे आश्‍वासन
स्थानिकांनी यासंदर्भात आमदार राहुल नार्वेकर तसेच मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याशी अनेकदा चर्चा केल्याचे सांगितले; मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होईल, असे आश्वासन देण्यात आले होते, पण ती बैठक अजून झालीच नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com