एअर इंडिगोच्या विमानाला मिळाला पहिला मान

एअर इंडिगोच्या विमानाला मिळाला पहिला मान

Published on

एअर इंडिगोच्या विमानाला मिळाला पहिला मान
ख्रिसमसच्या दिवशी नवी मुंबई विमानतळाहून करणार उड्डाण

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ : येत्या २५ डिसेंबरला ख्रिसमसच्या सकाळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले उड्डाण करण्याचा मान एअर इंडिगो या विमान कंपनीला मिळाले आहे. तसेच धावपट्टीवर उतरण्याचा पहिला मानही इंडिगो कंपनीला मिळाला आहे. बंगळूरहून येणारे पहिले विमान सकाळी ८ वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे, तर लगेच ८.४० मिनिटांनी इंडिगोचे दुसरे विमान हैदराबादकरिता उड्डाण करेल, अशी माहिती एनएमआयएएलकडून देण्यात आली.
८ ऑक्‍टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए)चे उद्घाटन झाले. त्यानंतर २५ डिसेंबर पासून विमानसेवा नियमित सुरू होणार आहे. या विमानसेवेचे काळजीपूर्वक टप्‍प्‍याटप्प्याने कार्यसंचालन सुरू होण्‍यासाठी मंच स्‍थापित केला आहे. पहिल्‍या दिवसापासून प्रवाशांची सुरक्षितता, विश्वसनीयता आणि आरामदायीपणाला प्राधान्‍य देण्‍यात येईल. पहिल्‍या महिन्‍यामध्‍ये एनएमआयए सकाळी ८ वाजल्‍यापासून रात्री ८ वाजेपर्यंत १२ तास कार्यरत असणार आहे. या विमानतळाहून दररोज २३ नियोजित विमानसेवा असणार आहेत. या कालावधीदरम्‍यान एअरपोर्ट प्रतितास जवळपास १० फ्लाइट्सचे व्‍यवस्‍थापन करणार आहे. एनएमआयए येथे आगमन करणारी पहिली फ्लाइट बंगळूरपासून येणारी इंडिगो ६E४६० असेल, जी सकाळी ८ वाजता एअरपोर्टवर उतरेल. या नंतर इंडिगो ६E८८२ सकाळी ८.४० वाजता हैदराबादसाठी उड्डाण घेईल. नवीन एअरपोर्टवरून पहिली आऊटबाउंड सेवा असणार आहे. सुरूवातीच्‍या लॉन्च कालावधीदरम्‍यान प्रवाशांना इंडिगो, एअर इंडिया एक्‍स्‍प्रेस व आकासा एअरद्वारे प्रवासी सेवा उपलब्ध केली आहे. या कंपन्यांमार्फत मुंबईला १६ प्रमुख देशांतर्गत जोडतात.
-----------------------------
फेब्रुवारीपासून २४ तास सेवेत
फेब्रुवारी २०२६ पासून एनएमआए हे एअरपोर्ट २४ तास सेवा देणार आहे. एमएमआरच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी दररोज ३४ फ्लाइट्स उड्डाण घेणार आहेत. सुव्‍यवस्थित शुभारंभाच्‍या खात्रीसाठी एनएमआयए सिक्‍युरिटी एजन्‍सीज व एअरलाइन सहयोगी अशा सर्व भागधारकांसोबत सहयोगाने सर्वसमावेशक ऑपरेनशल रेडिनेस अँड एअरपोर्ट ट्रान्‍स्फर (ओआरएटी) ट्रायल्‍स करत आहे. विमानतळाची सुसज्‍जता अधिक दृढ करण्‍यासाठी २९ ऑक्‍टोबर २०२५ रोजी एनएमआए येथे सेंट्रल इंडस्‍ट्रीयल सिक्‍युरिटी फोर्स (सीआयएसएफ) औपचारिकपणे सामील करण्‍यात आले, ज्‍यांना विमानतळावरील प्रमुख कार्यांच्‍या ठिकाणी तैनात करण्‍यात आले आहे.
------------------------------------------------
• दररोज २३ नियोजित फ्लाइट्स, ज्‍या फेब्रुवारी २०२६ पर्यंत जवळपास ३४ फ्लाइट्सपर्यंत वाढणार.
• सुरुवातीच्‍या टप्‍प्‍यात दररोज जवळपास १२० एअर ट्रॅफिक मूव्‍हमेंट्स (एटीएम).
• पहिल्‍या आगमन व निर्गमन फ्लाइट्स इंडिगोद्वारे ऑपरेट करण्‍यात येतील, ज्‍यानंतर एअर इंडिया एक्‍स्‍प्रेस आणि आकासा एअरच्‍या फ्लाइट्सचे कार्यसंचालन सुरू होईल.
-------------------------------------------------
ऑपरेशनल टप्‍पा एकूण दैनंदिन निर्गमन
२५ डिसेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ २३
१ फेब्रुवारी २०२६ पासून ३४
--------------------------------------------------

या ठिकाणी होणार उड्डाण
अहमदाबाद, औरंगाबाद, बंगळूर, चेन्‍नई, कोचीन, कोईम्‍बतूर, दिल्‍ली, गोवा, (जीओआय व जीओएक्‍स), हैदराबाद, जयपूर, जम्‍मू, कोलकाता, लखनौ, मंगळूर, नागपूर आणि वडोदरा
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com