नबाव मलिक यांना दणका

नबाव मलिक यांना दणका

Published on

नबाव मलिक यांना दणका

खटला चालवण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) नवाब मलिक यांच्याविरोधात खटला चालणार आहे. मलिक यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगितल्यानंतर विशेष न्यायालयाने मंगळवारी (ता. १८) निर्णय दिला.

मलिक आणि प्रकरणातील अन्य आरोपींनी आरोप अमान्य करून ते निर्दोष असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेऊन खासदार-आमदार प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी त्यांच्यावरील आरोप निश्चित केले. आता सर्व आरोपींविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार खटला चालणार आहे. याबाबत १९ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) खटला हा अंदाज आणि तर्कांवर आधारित असल्याचा दावा करून मलिक यांनी दोषमुक्तीची मागणी करणारा अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने ११ नोव्हेंबरला फेटाळला होता.

न्यायालयात काय घडले?
मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटांतील दोषी सरदार खान हा नागपूर तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजर होता. या प्रकरणाशी संबंधित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने पुढील कारवाईला स्थगिती देण्याची मागणी त्याने केली; पण आरोपींच्या उपस्थितीचा आग्रह न धरता व्हिसीद्वारे त्याचे म्हणणे नोंदवून घ्यावे आणि खासदार-आमदारांविरुद्धची प्रकरणे आरोप चार आठवड्यांत निश्चित करण्याचे आदेश १४ नोव्हेंबरला उच्च न्यायालयाने दिल्याची आठवण न्यायाधीशांनी आरोप निश्चित करताना करून दिली. उच्च न्यायालयाकडून असे आदेश देण्यात येतात. तसेच विशेष न्यायालयानेही आरोपनिश्चितीसाठी पुरेसे पुरावे, साहित्य असल्याचा निष्कर्ष काढलेला असतो, त्या वेळी प्रकरणाला स्थगिती देता येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रकरण काय?
हसीना पारकर, सलीम पटेल, १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लम्बर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदा बळकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फेब्रुवारी २०२२ मध्ये ईडीने मलिक यांना अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्याायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची सुटका झाली हाेती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com